घरमुंबईट्रेनमध्ये तरुणीसमोर हस्तमैथून करणारा अटकेत!

ट्रेनमध्ये तरुणीसमोर हस्तमैथून करणारा अटकेत!

Subscribe

अटक केलेल्या तरुणाला सार्वजनिक ठिकाणी असभ्य वर्तन केल्याप्रकरणी, १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

गेल्या आठवड्यात शुक्रवारी दुपारी सीएसएमटीहून  पनवेलला जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये, एका तरुणाने मुलीसमोर हस्तमैथुन केल्याचा विचित्र प्रकार घडला होता. मात्र, त्यावेळी या तरुणाविरोधात कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नव्हती. तरीही सीएसएमटी जीआरपीने मोठ्या शिताफीने या युवकाला मंगळवारी अटक केली. १९ वर्षीय इम्रान शेख असं या तरुणाचं नाव आहे. इम्रानवर सार्वजनिक ठिकाणी असभ्य वर्तन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी त्याला १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. जीआरपीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी सीएसएमटी व मस्जिद रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज चेक केले. तसंच ज्या व्यक्तीने इम्रानला प्रत्यक्षात पाहिलं होतं त्यांनी दिलेल्या आरोपीच्या फोटोवरुनही त्याची ओळख पटली. ‘दरम्यान आरोपी इम्रान कुठल्याही प्रकारची नोकरी नसून पोटापाण्यासाठी तो वेगवेगळी काम करतो’, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत बावढणकर यांनी दिली.

अशी घडली घटना

शुक्रवारी दुपारी सीएसएमटीहून २ वाजून ४२ मिनिटांनी पनवेलला जाणारी लोकल तिच्या निर्धारित वेळी सुटली. लोकलने वेग पकडल्यानंतर अचानक महिलांच्या डब्यातून एका मुलीचा ओरडण्याचा आवाज आला. प्रवाशांनी दचकून आजूबाजूला पाहिलं असता प्रथम वर्गाच्या महिला डब्यात, एक २० वर्षीय तरुण एका मुलीच्या बाजूला बसून तिच्यासोबत अश्लिल चाळे करत असल्याचं प्रवाशांच्या लक्षात आलं. दुपारची वेळ असल्याने गाडीला गर्दी नव्हती. त्यामुळे या तरुणाचं फावलं आणि त्याने महिलांच्या डब्यात चढत पिडीतेसोबत अश्लिल चाळे केले. तो अश्लिल चाळे करत असताना काही प्रवाशांनी या घटनेचा व्हिडिओ देखील काढला. दरम्यान ज्यावेळी लोकल ट्रेनने मस्जिद बंदर स्थानकात प्रवेश केला, त्यावेळी त्या तरुणाने प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर चालत्या गाडीतून उडी मारली आणि पसार झाला. गाडीतून उडी मारल्यानंतर तो तरुण वेगाने बाजूचे २ ट्रॅक ओलांडले आणि प्लॅटफॉर्म क्रमांक ३ आणि ४ च्या गर्दीत जाऊन मिसळला, अशी माहिती उपस्थितांनी दिली.

- Advertisement -

…म्हणून पोलिसांच्या मदतीला उशीर

ही घटना घडल्यानंतर तात्काळ काही प्रवाशांनी याची सर्व माहिची रेल्वे पोलिसांच्या १५१२ क्रमांकावर दिली आणि त्या मुलीला आधाराची गरज असल्याने लवकरात लवकर मदत पाठवण्याची विनंतीही केली. मात्र, तोपर्यंत गाडी वडाळा स्थानकात पोहोचली होती. पीडित मुलीने वडाळा स्थानकात उतरुन तक्रार नोंदवावी असा सल्लाही काही प्रवाशांनी दिला. मात्र, मुलगी प्रचंड घाबरलेली असल्याने तिने तक्रार दिली नाही. त्यामुळे पोलिसांची कारवाई होण्यास काहीसा उशीर झाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -