घरCORONA UPDATECoronavirus: पोलिस हवालदार आणि टिकटॉक स्टार अर्पिता चौधरींना कोरोनाची लागण

Coronavirus: पोलिस हवालदार आणि टिकटॉक स्टार अर्पिता चौधरींना कोरोनाची लागण

Subscribe

अर्पिता चौधरींचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे आणि त्यांना वडनगरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे.

गुजरातमध्ये कोरोना विषाणूचा कहर कायम आहे. अनेक पोलिस कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान, महिला हवालदार अर्पिता चौधरी यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. अर्पिता चौधरी एक टिकटॉक स्टार आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांनी पोलिस स्टेशनमध्ये एक टिकटॉक व्हिडिओ बनवला होता. हा टिकटॉकचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बराच वाद झाला होता. यानंतर उच्च अधिकाऱ्यांनी त्यांना निलंबित केलं होतं. तथापि, कोरोनामुळे त्यांचं निलंबन रद्द करण्यात आलं.

दरम्यान, पोलिस ठाण्यात कार्यरत महिला पोलिस हवालदार अर्पिता बाबुभाई चौधरी यांचा सायंकाळी कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सोशल मीडियावर याबाबत नुकताच त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये अर्पिता सांगत होत्या की त्यांना कोरोना झालेला नाही, त्या ठीक आहेत. पण कोरोना पॉझिटिव्हच्या यादीमध्ये हवालदार अर्पिताचे नाव आणि तिचा घराचा पत्ताही लिहिला होता. दरम्यान, आता खुद्द अर्पिता चौधरी यांनी खुलासा केला आहे की त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे आणि त्यांना वडनगरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे. त्यांची तब्येत पूर्णपणे ठीक आहे. त्यांना कोरोना विषाणूची कोणतीही लक्षणं नाहीत, परंतु अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्या म्हणाल्या की त्यांचा जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा १७ मार्चचा व्हिडिओ आहे. परदेशातून आल्यानंतर त्यांना कोरोना असल्याची अफवा पसरली होती, त्यानंतर त्यांनी हा व्हिडिओ बनवला. जो आता व्हायरल होत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – दिलासादायक! कोरोनाचा गुणाकार मंदावला; मृत्यूदरही कमी


विशेष म्हणजे गुजरातमध्ये कोरोना विषाणूची ५००० पेक्षा जास्त प्रकरणे नोंदली गेली आहेत. एकट्या अहमदाबादमध्ये ३५०० हून अधिक प्रकरणे नोंदली गेली आहेत. अहमदाबादला लागून असलेल्या मेहसाना जिल्ह्यात एकाच दिवशी एकूण २१ प्रकरणे नोंदली गेली. त्यामुळे येथे एकूण ३२ कोरोनाचे रुग्ण आहेत.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -