घरCORONA UPDATEदिलासादायक! कोरोनाचा गुणाकार मंदावला; मृत्यूदरही कमी

दिलासादायक! कोरोनाचा गुणाकार मंदावला; मृत्यूदरही कमी

Subscribe

भारताने तब्बल १० लाख कोरोना टेस्ट केल्या आहेत.

देशातील झपाट्याने वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येचा वेग आता काहीसा कमी झाल्याची दिलासादायक बातमी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली आहे. कोरोनाचा गुणाकार आता मंदावला आहे. कोरोनाच्या रुग्णांची संख्या दुप्पट होण्यासाठी या आधी १०.५ दिवस लागत होते. मात्र हा दर १२ दिवसांवर आला आहे. त्यामुळे आता कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होण्यासाठी १२ दिवस लागतात, असं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं.

दरम्यान, इतर देशांच्या तुलनेत भारतातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही सर्वात कमी असल्याचं सांगितलं. एकूण रुग्णांच्या केवळ ३.२ टक्के रूग्णांचा मृत्यू होतो. विशेष म्हणजे एका दिवसात तब्बल दहा हजार रुग्ण बरे होऊन घरी परतले असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली.

- Advertisement -

१० लाख कोरोना टेस्ट

भारताने शनिवारपर्यंत एकूण १० लाख कोरोना टेस्ट केल्या आहेत. दिवसभरात जवळपास ७४ हजार टेस्ट केल्या जात आहेत. यासह देशातील ३१९ जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही, ही एक समाधानकारक बाब आहे. १३० जिल्हे कोरोनाचे हॉटस्पॉट आहेत. तर २८३ जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण आहेत, पण त्यांची संख्या कमी आहे.

- Advertisement -

हेही वाचा – IFSC मुंबईतून हलवण्याला पवारांचा विरोध, मोदींना लिहिले पत्र


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -