घरदेश-विदेशLockDown: आता कंपनी ठेवणार आपल्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर नजर!

LockDown: आता कंपनी ठेवणार आपल्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर नजर!

Subscribe

मोबाईल अॅप्सच्या माध्यमातून कंपनी घेणार आपल्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कंपन्या नवीन पद्धती अवलंबताना दिसत आहेत. आपल्या कर्मचार्‍यांचा कोरोनापासून बचाव करण्यासाठी अनेक कंपन्या पुढे सरसावल्या आहेत. दरम्यान काही कंपन्या आता मोबाईल अॅप्सच्या माध्यमातून आपल्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणार आहे. यासाठी कंपनी अंतर्गत विकसित अ‍ॅप्सचा आधार घेऊन त्यांच्या कर्मचार्‍यांच्या आरोग्यासह कुटुंबियांच्या आरोग्याची देखील काळजी घेत आहे.

कंपनीला कर्मचारी अशी देताय माहिती

तज्ञांच्या मते, लॉकडाऊननंतर आपल्या कर्मचार्‍यांच्या आरोग्याविषयी संपूर्ण माहिती ठेवण्यासाठी सरकारकडून मार्गदर्शक तत्त्वे जारी केली जाऊ शकतात. देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे आठ लाख कर्मचारी त्यांच्या कंपनीतर्फे निर्माण केलेल्या अ‍ॅपच्या माध्यमातून आपल्या आरोग्यविषयक माहिती त्यांच्या एचआर विभागाला देत आहेत. ‘कोविड19 सिंपटम चेकर’ असे या अॅपचे नाव असून सर्व कर्मचारी या अ‍ॅपवर त्यांची संपूर्ण माहिती देत असून सकाळी 9 ते 11 दरम्यान ही माहिती देणे बंधनकारक आहे.

- Advertisement -

खोटी माहिती देणाऱ्यावर होणार कारवाई

देशातील सर्वात मोठी कार उत्पादक मारुती सुझुकीचे कर्मचारीसुद्धा त्यांच्या कंपनीच्या अॅपवर सकाळी 7 ते 9 दरम्यान आरोग्याविषयी माहिती देत आहेत. या कंपन्यांचे कर्मचारी सध्या घरून काम करत असले तरी कंपनीच्या अ‍ॅपवर आरोग्याची माहिती न दिल्यास त्यांना त्यांच्या व्यवस्थापकांकडून कॉल देखील करण्यात येतो. रिलायन्स आणि मारुतीसारख्या बड्या कॉर्पोरेट कंपन्यांनी हा ट्रेंड सुरू केला आहे.

या कंपनीच्या कर्मचार्‍यांच्या मते, या अॅपच्या माध्यमातून माहिती दिल्याने कंपनीला कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची माहिती मिळते. यावरून कोण कामावर येऊ शकते आणि कोण नाही याचा निर्णय कंपनीला घेणे सोपे होते. मात्र कर्मचाऱ्यांनी चुकीची माहिती दिली तर त्यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते.

- Advertisement -

CoronaVirus: न्यू डेव्हलपमेंट बॅंक १५ अब्ज डॉलर्स देणार, भारतासह या देशांना मिळणार मदत!

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -