घरदेश-विदेशपंतप्रधान मोदी यांची ब्रिटनचे पंतप्रधान सुनूक यांच्याशी चर्चा, मुक्त व्यापार कराराबाबत बातचीत

पंतप्रधान मोदी यांची ब्रिटनचे पंतप्रधान सुनूक यांच्याशी चर्चा, मुक्त व्यापार कराराबाबत बातचीत

Subscribe

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी ब्रिटनचे नवे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याशी फोनवरून चर्चा केली. पंतप्रधान झाल्याबद्दल त्यांनी सुनक यांचे अभिनंदन केले. यावेळी मोदींनी भारत-ब्रिटनचे द्विपक्षीय संबंध आणि व्यापार करारासंदर्भात चर्चा केली. सर्वंकष आणि संतुलित मुक्त व्यापार करार (एफटीए) लवकर अंमलात येणे महत्त्वाचे आहे, यावर आमची सहमती झाली, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

- Advertisement -

जुलै महिन्यात ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या मंत्रिमंडळातील 4 मंत्र्यासह 40 जणांनी राजीनामे दिल्याने ते सरकार कोसळले होते. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत ऋषी सुनक यांचा पराभव करून लिझ ट्रस विजयी झाल्या होत्या. पण अवघ्या 45 दिवसांतच त्यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर ऋषी सुनक हे ब्रिटनचे नवे पंतप्रधान झाले. त्यावेळी देखील पंतप्रधान मोदी यांनी ट्वीट करत सुनक यांचे अभिनंदन केले होते. मी जागतिक समस्यांवर एकत्र काम करण्यास आणि रोडमॅप 2030ची अंमलबजावणी करण्यास उत्सुक आहे. ब्रिटिश भारतीयांचा ‘लिव्हिंग ब्रिज’ आहो. आम्ही ऐतिहासिक संबंधांचे आधुनिक भागीदारीत रूपांतर केले आहे, असे मोदी यांनी म्हटले होते.

त्यानंतर आज नरेंद्र मोदी यांनी सुनक यांच्याशी फोनवर संपर्क साधला. ब्रिटनचे पंतपर्धान ऋषी सुनक यांच्याशी बोलून आनंद झाला. ब्रिटनचे पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. आम्ही आपली सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करण्‍यासाठी एकत्र काम करू. सर्वंकष आणि संतुलित मुक्त व्यापार करार (एफटीए) लवकर अंमलात येणे महत्वाचे आहे, यावर आमची सहमती झाली, असे मोदी यांनी सांगितले.

- Advertisement -

सुनक यांचेही ट्वीट
पंतप्रधान झाल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी शुभेच्छा दिल्या. त्यासाठी मी त्यांचे आभार मानले. ब्रिटन आणि भारत यांच्यात खूप काही देवाण-घेवाण झाली आहे. लोकशाहीचे पुरस्कार करणारे आपले दोन महान देश येत्या महिने आणि वर्षांमध्ये आपली सुरक्षा, संरक्षण आणि आर्थिक भागीदारी आणखी दृढ करतील, असे ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी ट्वीट केले आहे.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -