घरदेश-विदेशआम्हाला कोणी छेडले तर त्याला सोडत नाही

आम्हाला कोणी छेडले तर त्याला सोडत नाही

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इशारा

आम्ही कुणाला मुद्दामहून छेडत नाही आणि आम्हाला कुणी छेडले तर त्याला सोडतही नाही. आम्ही शांततेचे कट्टर पुरस्कर्ते आहोत. पण देशाच्या रक्षणासाठी कुठलेही पाऊल उचलण्यास आम्ही मागेपुढे पाहणार नाही. म्हणूनच गेल्या चार वर्षांत देशाचे रक्षण आणि संरक्षणाच्यादृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत, असे ठाम प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

दिल्लीत झालेल्या एनसीसी मेळाव्याला संबोधित करताना पंतप्रधान बोलत होते. ते पुढे म्हणाले की, मी तुम्हाला संबोधित करण्यासाठी जेव्हा येतो तेव्हा माझ्या मनात भूतकाळातील आठवणी ताजा होतात. हा दिवस जो आज तुम्ही अनुभवत आहात, तेच क्षण मलाही अनुभवता आले होते, असे मोदींनी एनसीसी कॅडेटना सांगितले.

- Advertisement -

आपल्या लष्करानेही आता शत्रूंना स्पष्ट संदेश दिलेला आहे. आम्ही मुद्दामहून कुणाच्या वाटेला जात नाही, पण कुणी आम्हाला छेडले तर त्याला सोडतही नाही. भारत हा शांततेचा कट्टर पुरस्कर्ता आहे. मात्र, राष्ट्राच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती पावले उचलायला आम्ही कचरत नाही, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला.जल, स्थळ आणि आकाशातून अण्वस्त्र हल्ले करण्याची व असे हल्ले थोपवण्याची क्षमता असलेला भारत हा जगातील निवडक देशांपैकी एक आहे.

मागील चार-साडेचार वर्षांत आम्ही ही शक्ती वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. वर्षानुवर्षे लटकलेले लढाऊ विमानं व तोफांच्या खरेदीचे करार प्रत्यक्षात आणले आहेत. देशात सध्या क्षेपणास्त्रांपासून ते रणगाडे, दारूगोळा व हेलिकॉप्टर्सची निर्मिती केली जात आहे. देशाच्या सुरक्षेसाठी कुठलाही कितीही मोठा व कठोर निर्णय घेण्यास आम्ही मागे पुढे पाहणार नाही,’ अशी ग्वाही मोदी यांनी दिली.

- Advertisement -

पंतप्रधानांनी यावेळी एनसीसीच्या कॅडेटचे तोंडभरून कौतुक केले. केरळमध्ये आलेल्या महापुरात एनसीसीने केलेले काम खूपच कौतुकास्पद होते. सहकार्य आणि त्यागाचा धडाच तुम्ही त्या कठीण प्रसंगात घालून दिला, एनसीसीच्या माध्यमातून तुम्ही घेत असलेल्या कष्टाची मला जाणीव आहे. हेच कष्ट, हेच श्रम तुम्हाला समर्थ बनवतील,’ असा विश्वसाही त्यांनी व्यक्त केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -