घरदेश-विदेशपंतप्रधानांची ७४ व्या स्वातंत्र्यदिनी देशवासियांना 'राष्ट्रीय डिजिटल आरोग्य मिशन'ची भेट

पंतप्रधानांची ७४ व्या स्वातंत्र्यदिनी देशवासियांना ‘राष्ट्रीय डिजिटल आरोग्य मिशन’ची भेट

Subscribe

देशाच्या ७४ व्या स्वातंत्र्य दिन सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले. त्यावेळी लष्करातील तिनही दलाचे प्रमुख तसेच जवान येथे उपस्थित होते. केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या तसेच मर्यादित मान्यवरांच्या उपस्थितीत हा ध्वजारोहण सोहळा पार पडला. यावेळी लाल किल्ल्याहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. यंदा ७ व्यांदा पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून भाषण केले. ७४ व्या स्वातंत्र्य दिनी पंतप्रधानांनी देशाला राष्ट्रीय डिजिटल आरोग्य मिशनची भेट दिली असून त्यामुळे प्रत्येक भारतीयाचे डिजिटल हेल्थ कार्ड बनणार आहे. शिवाय जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूवरही भारतात लस बनवण्याची प्रक्रिया प्राधान्याने सुरू असून लवकरच या लसीचे उत्पादन केले जाईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. पंतप्रधानांनी देशातील युवा पिढीला प्रेरणा म्हटले असून त्यांच्या आत्मनिर्भर या नाऱ्याचाही पुनरोच्चार केला. शिवाय देशातील महिला सक्षम, बलळ होत असून तिला आणखी प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. लडाखच्या सीमेवर भारत – चीन जवानांमध्ये झालेल्या चमकमीबाबत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे शौर्य साऱ्या जगाने पाहिल्याचे म्हटले. पंतप्रधानांनी यावेळी अनेक मुद्द्यांना हात घातला असून ७५ व्या स्वातंत्र्य दिनाच्या वाटचालीकडे असताना आदर्श भारत कसा असेल याबाबतची कल्पना त्यांनी देशवासियांसमोर मांडली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे –

  • कोरोनाने सगळयांना रोखले आहे. कोरोनाच्या कालखंडात कोरोना योद्ध्यांनी देशवासियांची सेवा केली आहे. त्या सर्वांना मी नमन करतो. १३० कोटी देशवासियांच्या संकल्पशक्तीने कोरोनावर विजय मिळवू. आत्मनिर्भर भारत एक शब्द नाही, १३० कोटी देशवासियांसाठी मंत्र बनला आहे. आत्मनिर्भर होणे अनिवार्य आहे. जे कुटुंबासाठी आवश्यक आहे, ते देशासाठी आवश्यक आहे. भारत आत्मनिर्भर बनून दाखवेल. मला देशाच्या प्रतिभेवर पूर्ण विश्वास आहे. भारताने ठरवले तर करुन दाखवतो. जगाला भारताकडून अपेक्षा आहे.
  • आपल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाची आठवण करण्याचा आजचा दिवस आहे. सतत देशवासियांच्या सुरक्षेमध्ये असणाऱ्या लष्कर, निमलष्करी दल आणि पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस आहे. देशात मोठया प्रमाणावर नैसर्गिक साधन संपत्ती आहे. त्यात वाढ करण्याची आवश्यकता आहे. कच्चा माल कधीपर्यंत जगामध्ये पाठवत राहणार? त्यासाठी आत्मनिर्भर बनणे आवश्यक आहे. जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये योगदान द्यायचे आहे. कृषिक्षेत्रात भारत आत्मनिर्भर आहे. फक्त देशाचीच नव्हे तर अन्य देशांनासुद्धा कृषिमालाचा पुरवठा करु शकतो. एक काळ होता आपल्या देशात ज्या वस्तुंची निर्मिती व्हायची, त्याचे जगभरात कौतुक व्हायचे. आत्मनिर्भर म्हणजे फक्त आयात कमी करणे नव्हे, तर भारतात बनवलेल्या सामानाचे सर्वत्र कौतुक झाले पाहिजे.
  • वोकल फॉर लोकल जीवनाचा मंत्र बनला पाहिजे. भारतात मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या सुधारणा जग पाहत आहे. त्यामुळेच भारतात होणाऱ्या FDI गुंतवणूकीचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. करोना संकटकाळातही भारतात मोठया प्रमाणावर FDI गुंतवणूक झाली आहे. मेक इन इंडियाच्या बरोबरीने आता मेक फॉर वर्ल्डसाठी उत्पादने बनवायची आहेत. विकास यात्रेत मागे राहिलेल्या देशातील ११० जिल्ह्यांना पुढे नेण्यासाठी विशेष प्रयत्न करणार. शेतकऱ्यांना बंधनातून मुक्त केले. माझ्या देशातील शेतकरी उत्पादन केल्यानंतर त्याल हवं तिथे तो विकू शकत नव्हता. आम्ही त्याला बंधनातून मुक्त केले. आता तो त्याला हव तिथे, त्याच्या अटीनुसार पिकवलेला कृषीमाल विकू शकतो. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. सात कोटी गरीब कुटुंबांना मोफत गॅस सिलिंडर दिला. ८० कोटी पेक्षा जास्त लोकांना मोफत अन्न दिले. ९० हजार कोटी थेट बँक खात्यात जमा केले.
  • देशात आजपासून ‘नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन’ सुरू करण्याची घोषणाही मोदी यांनी यावेळी केली. या अंतर्गत देशातील सर्व नागरिकांना डिजिटल ‘हेल्थ आयडी’ दिला जाणार आहे. यात संबंधित व्यक्तीच्या आरोग्याची सर्व माहिती असेल. एखाद्या व्यक्तीवर किती चाचण्या झाल्या, त्याला कोणते आजार आहेत, कोणत्या डॉक्टरनं त्याला औषध दिले, केव्हा दिले. तपासणीचा अहवाल काय आहे, ही सगळी माहिती यात समाविष्ट असेल. हे डिजिटल हेल्थ मिशन देशाच्या आरोग्य क्षेत्रात नवी क्रांती ठरेल.
  • पंतप्रधान मोदी यांनी देशातील कोरोनाची सद्यस्थिती, आरोग्य व्यवस्थेची स्थिती आणि कोरोनावर मात करण्यासाठी संशोधक करत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. करोनावरील लस बनविण्यासाठी भारतातील संशोधक अथक परिश्रम करत आहेत. देशात सध्या एक, दोन नव्हे तर तीन-तीन लसी चाचणीच्या टप्प्यात आहेत. संशोधकांनी हिरवा झेंडा दाखवताच या लसींची मोठ्या प्रमाणावर निर्मिती केली जाईल. त्याची तयारी देखील झाली आहे. ही लस प्रत्येक भारतीयांपर्यंत पोहोचेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा –

आधी गणपती विसर्जन, मगच पोलिसांच्या बदल्या!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -