घरदेश-विदेशमोस्ट वॉण्टेड दहशतवादी पंजाबमध्ये; फोटो जारी

मोस्ट वॉण्टेड दहशतवादी पंजाबमध्ये; फोटो जारी

Subscribe

मंगळवारी रात्री पठाणकोट नॅशनल हायवेवर माधोपूरजवळ या दहशतवाद्यांनी कार चालकाला बंदूकीचा धाक दाखवून त्याला गाडीतून बाहेर फेकले आणि कार घेऊन फरार झाले होते. या घटनेला ४८ तास झाले अद्याप पोलिसांना काहीच माहिती मिळालेली नाही.

पंजाब पोलिसांना गुप्तचर विभागाकडून जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे सहा ते सात दहशतवादी घुसल्याची माहिती मिळाली होती. असे सांगितले जात आहे की, हे दहशतवादी दिल्लीमध्ये देखील घुसण्याचा प्रयत्न करत आहे. पंजाब पोलिसांनी शुक्रवारी या दहशतवाद्यांचे फोटो लावलेले पोस्टर जारी केले आहेत. संपूर्ण पंजाबमध्ये दहशतवादी घुसल्यामुळे अलर्ट जारी करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांना देखील अलर्ट देण्यात आला आहे. पोलीस मुख्यालयाला देण्यात आलेल्या माहितीनुसार, आरएसएसच्या शाखा दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहेत. त्याव्यतिरिक्त, आरएसएसचे मोठे नेते, राजकीय पक्षांच्या सभांवर हे दहशतवादी हल्ला करु शकतात. त्यामुळे पंजाबसह दिल्लीमध्ये हायअलर्ट देण्यात आला असून ठिकठिकाणी नाकाबंदी करुन गाड्यांची तपासणी केली जात आहे.

- Advertisement -

पंजाबमध्ये कडेकोट बंदोबस्त

गुरुदासपूरचे एसएसपी स्वर्णदीप सिंह यांनी शुक्रवारी सांगितले की, गुप्तचर विभागाकडून हे दहशतवादी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे असल्याची माहिती मिळाली आहे. या दहशतवाद्यांना पाकिस्तानच्या फिरोजपुरजवळून पंजाबमध्ये घुसखोरी करण्यात यश आले आहे. या माहितीला लक्षात घेता आम्ही महत्वपूर्ण पाऊल उचलले असून पंजाबमध्ये कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. सर्व भागामध्ये अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात केला असून सर्च ऑपरेशन सुरु केले आहे.

जाकिर मूसासह दहशतवाद्यांचे पोस्टर जारी

कुख्यात दहशतवादी जाकिर मूसासह काही दहशतवाद्यांचे फोटो असलेले पोस्टर जारी करण्यात आले असल्याचे स्वर्णदीप सिंह यांनी सांगितले. आम्हाला जाकिर मूसाचे अमृतसरच्या आसपास असण्याची माहिती मिळाली होती. अशामध्ये लोकांना सावध करण्यासाठी तसंच यासंदर्भात माहिती देण्याकरता लोकांना अपील करत जाकिर मूसाचे फोटोवाले पोस्टर जारी केले आहेत. लोकांना अपील केले गेले आहे की, याबाबत काहीही माहिती मिळाली तर ताबडतोब पोलिसांना सांगा.

- Advertisement -

सर्व जिल्ह्यांमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवली

गुप्तचर विभागाने सांगितले आहे की, दहशतवादी पंजाबवरुन दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. हे दहशतवादी फिरोजपूर, गुरुदासपूर, पठानकोट, अमृतसर या भागामध्ये लपल्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व जिल्ह्यातील एसएसपी, पोलीस अधिकारी, कमिशनर यांच्यासह बीएसएफला अलर्ट देण्यात आला आहे. सगळ्या शहरांमध्ये नाकाबंदी करुन वाहनांची तपासणी केली जात आहे. सार्वजनिक ठिकाणी जास्त लक्ष केंद्रित करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

कार घेऊन दहशतवादी फरार

एका एसयूव्ही कारमधून चार दहशतवाद्यांनी जम्मूकडून आले आहेत. त्यांनी जम्मूच्या टॅक्सी स्टँडवरुन कारला बूक केले होते. मंगळवारी रात्री पठाणकोट नॅशनल हायवेवर माधोपूरजवळ या दहशतवाद्यांनी कार चालकाला बंदूकीचा धाक दाखवून त्याला गाडीतून बाहेर फेकले आणि कार घेऊन फरार झाले होते. या घटनेला ४८ तास झाले अद्याप पोलिसांना काहीच माहिती मिळालेली नाही. या घटनेनंतर पंजाब आणि जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. त्याचसोबत सुरक्षा एजन्सीला हाय अलर्ट देण्यात आला आहे.

Priya Morehttps://www.mymahanagar.com/author/priya/
गेल्या ६ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत आहे. मला लिहायला, वाचायला आवडतेच पण त्यासोबतच मला नविन ठिकाणी फिरायला खूप आवडते. सध्या नविन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -