घरताज्या घडामोडीPutin Ukraine War:सोव्हियत संघाचे तुकडे, वॉशिंग मशीन आणि सूडाने पेटलेले पुतीन

Putin Ukraine War:सोव्हियत संघाचे तुकडे, वॉशिंग मशीन आणि सूडाने पेटलेले पुतीन

Subscribe

रशियाने युक्रेनवर हल्ला केला असून अनेक शहरांवर कब्जा मिळवला आहे. या संघर्षात युक्रेनचे 137 तर रशियाचे 430 सैनिक ठार झाले आहेत. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या आदेशानंतरच रशियन सैनिकांनी युक्रेनवर क्षेपणास्त्र डागली आहेत. पण सगळं जग पुतीन यांना सबुरीचा सल्ला देत असताना त्यांनी मात्र युक्रेनवर थेट हल्ला करण्याची टोकाची भूमिका का घ्यावी हे जाणून घेण महत्वाचे आहे.

पुतीन यांचा राग युक्रेनवर आताचा नसून त्यामागे मोठी पार्श्वभूमी आहे. सोव्हियत संघाच्या विघटनापासूनच पुतीन सूडाच्या आगीत जळत होते. सोव्हियत संघाच्या विघटनानंतर केजीबीचे गुप्तहेर असलेले पुतीन जर्मनीहून 20 वर्ष जुनी वॉशिंग मशीन घेऊन रशियातून थेट लेनिनग्राड येथे आले . सोव्हियत संघाचे झालेले तुकडे पुतीन यांच्या जिव्हारी लागले होते. 20 व्या शतकातील सर्वात मोठे भूराजकीय संकट असे त्यांनी यास नाव दिले होते.

- Advertisement -

38 वर्षांचे होते. त्यानंतर ते जर्मनीहून पीटर्सबर्गला आले. तेथे 15 वर्ष ते गुप्तहेर होते. पुतीन यांचा जन्म उंदरांचे साम्राज्य असलेल्या लेनिनग्राड येथे एका कुप्रसिद्ध शहरात 7 ऑक्टोबर 1952 साली झाला. त्यांचे पूर्ण नाव व्‍लादिमीर व्‍लादिमीरोविच पुतिन आहे.

पुतीन हे त्यांच्या आई वडिलांसाठी एक चमत्कार होते . पुतीन हे व्‍लादिमीरोविच आणि मारिया यांचे एकुलते एक अपत्य होते. त्यांचे वडील कम्युनिस्ट पार्टीचे सदस्य होते. ते एका कंपनीत फोनमॅनचे काम करायचे. तर त्यांची आई मारिया एका लॅबमध्ये क्लिनर होती. नाझीच्या सैनिकांनी ज्यावेळी जेव्हा लेनिनग्राडवर कब्जा केला तेव्हा ती थोडक्यात बचावली होती. याबद्दल पुतीन यांनी त्यांच्या आत्मकथेतही लिहले आहे. एकदा माझी आई मरियम उपासमारीमुळे बेशुद्ध पडली. लोकांना वाटले तिचा मृत्यू झाला. यामुळे त्यांनी तिला मुर्दाघरात जाऊन ठेवले. असे पुतीन यांनी पुस्तकात लिहले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -