‘परिस्थिती भयावह आहे’ रशिया-युक्रेन युद्धावर प्रियंका चोप्राने व्यक्त केली चिंता

actress priyanka chopra shares emotional video of ukraine people after russia attack says situation is terrifying
'परिस्थिती भयावह आहे' प्रियंका चोप्राने व्हिडीओतून दाखवली युक्रेनची धक्कादायक स्थिती

युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धामुळे परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत जात आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे व घबराहटीचे वातावरण आहे. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या आदेशानुसार रशियाने युक्रेनवर क्षेपणास्त्रांचा वर्षाव केला आहे. त्यामुळे युक्रेनचे लोक जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे धाव घेत आहेत. यात बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रो हीने ही युक्रेनमधील लोकांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. सध्या युक्रनमधील परिस्थिती फार भयावह असल्याचे तिने म्हटले आहे.

प्रियंकाने युक्रेनवरील रशियाच्या हल्ल्याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हृदय पिळवटून टाकणारा तो व्हिडिओ पाहून कोणाच्याही डोळ्यात पाणी येईल. प्रियंकाने तिथली परिस्थिती भयानक असल्याचे वर्णन केले आहे. प्रियंकाने इंस्टाग्राम अकाऊंटवर व्हिडीओ करत काही गोष्टीही लिहिल्या आहेत. या व्हिडिओमध्ये लोकं आपल्या जीवाला घाबरल्याचे दिसत आहे. उद्या काय होणार? आपण जगू शकतो का? असं अनेक प्रश्न त्या लोकांना सतावत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Priyanka (@priyankachopra)

युक्रेनबद्दल चिंता व्यक्त करताना प्रियंकाने इंस्टाग्रामवर लिहिले की, ‘युक्रेनमध्ये सध्याची परिस्थिती खूप भीतीदायक आहे. निष्पाप लोक स्वतःच्या आणि आपल्या प्रियजनांच्या जीवासाठी भीतीच्या छायेखाली जगत आहेत. ते भविष्याची अनिश्चितता मोजण्याचा प्रयत्न करत आहेत. आजच्या आधुनिक जगात अशी भयावह आणि भीतीदायक परिस्थिती कशी निर्माण होऊ शकते हे समजणे कठीण आहे? या युद्धक्षेत्रात राहणारे निष्पाप लोक तुमच्या आणि माझ्यासारखेच आहेत. युक्रेनमधील लोकांना पुढे कशी मदत करावी याबद्दलची सर्व माहिती माझ्या बायो लिंकमध्ये आहे.’

प्रियंका चोप्राच्या या मेसेजवर युजर्सच्या अनेक कमेंट्स येत आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘कृपया आम्हाला वाचवा. कृपया हा मेसेज भारतीय दूतावासाकडे पाठवा. दुसऱ्या यूजरने लिहिले की, ‘जगाने पुढे येऊन हा वेडेपणा थांबवण्याची गरज आहे.’


फरहान-शिबानीच्या पार्टीमध्ये Aryan, Suhana अन् Gauri ची एन्ट्री