घरताज्या घडामोडी'No-Fly Zone'वर पुतिन यांचा इशारा; 'जर असे केले तर होतील विनाशकारी परिणाम'

‘No-Fly Zone’वर पुतिन यांचा इशारा; ‘जर असे केले तर होतील विनाशकारी परिणाम’

Subscribe

जेव्हा कोणताही देश युक्रेनवर नो फ्लाय झोन (No-fly Zone in Ukraine) लागू करेल, तेव्हापासून आम्ही त्या देशाला युद्धात सामील असलेला देश मानू. तसेच नो फ्लाय झोन लागू केल्यामुळे याचे विनाशकारी परिणाम फक्त युरोपवर (Europe)नाही तर संपूर्ण जगावर होतील, असा थेट इशारा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी दिला आहे.

एरोफ्लॉटच्या कर्मचाऱ्यांसोबत बैठकीत रशियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले की, या दिशेने होणाऱ्या कोणत्याही हालचाली आमच्याकडून लष्करी संघर्षात भाग घेतल्याचे मानले जाईल. त्यामुळे नो फ्लाय झोन लागू केल्यामुळे फक्त युरोपावर नाही तर संपूर्ण जगावर मोठे विनाशकारी परिणाम होतील.

- Advertisement -

दरम्यान रशिया मार्शल लॉ घोषित करण्याची योजना बनवत आहे, अशी अफवा पसरली होती. ही अफवा पुतिन यांनी फेटाळून लावली आहे. पुतिन म्हणाले की, जेव्हा बाहेरील हल्ले होतात तेव्हा मार्शल लॉ लागू केला जातो. सध्या असे काही दिसत नाहीये आणि आम्ही असे करणार नाही, अशी मला आशा आहे.

यापूर्वी युक्रेनवर हल्ला केल्यामुळे रशियात निषेधार्थ आंदोलन केली जात होती. तेव्हापासून आंदोलन रोखण्यासाठी रशियामध्ये मार्शल लॉ लागू केला जाऊ शकतो अशा चर्चांना उधाण आले होते. मात्र आता स्वतः पुतिन यांनी मार्शल लॉ लागू होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

दरम्यान युक्रेनचे राष्ट्रपती झेलेंस्की यांनी युक्रेनवर नो-फ्लाय झोनची विनंती केली होती. परंतु नाटोने त्याला नकार दिला. त्यावेळेस युक्रेनकडून असे उत्तर आले की, या दिवसापासून मृत्यू झालेले प्रत्येकजण तुमच्या मरण पावतील.


हेही वाचा – Russia-Ukraine War: इस्राईलचे पंतप्रधान रशियात दाखल, पुतिन यांच्यासोबत युक्रेन संकटावर चर्चा, युद्ध थांबण्याची शक्यता


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -