घरदेश-विदेशप्रथमच निरोगी शरीरात आढळले 'हे' DNA; संशोधकही पडले पेचात

प्रथमच निरोगी शरीरात आढळले ‘हे’ DNA; संशोधकही पडले पेचात

Subscribe

मानवाचे शरीर हे डीएनएने बनलेले आहेत. (DNA) डीएनए म्हणजेच डीऑक्सीराइबोन्यूक्लिक एसिड. आतापर्यंत आपल्याला माहिती होते की डीएनएची रचना ही डबल हेलिक्स आहे. मात्र आता शास्त्रज्ञांना मानवाच्या शरीरात चार हेलिक्सवाले डीएनए आढळून आले आहेत. संशोधन या डीएनएची चाचणी करत असून आता डीएनए आपली रचना बदलत आहेत का याचा शोध घेत आहेत. डबल हेलिकस डीएनएमुळेच मानवाच्या शरिराची रचना तयार होते. साधारणतः चार हेलिक्स डीएनए कँसरच्या काही कोशिकांमध्ये आढळून येतात. अन्यथा याला प्रयोगशाळेतील प्रयोगांकरता बनवले जाते. मात्र प्रथमच असे आढळून आले आहेत की, मानवाच्या शरीरातील कोशिशांमध्ये चार हेलिक्स डीएनए सापडले आहेत.

- Advertisement -

लंडन येथील इंपिरियल कॉलेजचे शास्त्रज्ञ मार्को डी एंतोनिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही या चार लेलिक्स डीएनएला पाहून चकित झालो आहोत. आता आम्हाला पुन्हा डीएनएच्या रचनेची सुरूवात कशी होते, याचे संशोधन करावे लागणार आहे. डीएनए हे चार न्युक्लियोबसपासून बनते. एडीनिन, साईटोसिन, गुआनिन आणि थाईमिन हे ते चार न्युक्लियोबस आहेत. हे चार शरिराच्या आतील अंगाच्या निर्मितीसाठी आवश्यकतेनुसार एकमेकांशी जोडले जातात.

हेही वाचा –

OxfordVaccine : पुण्याच्या सिरम इंस्टिट्युटमध्ये डिसेंबरपर्यंत बनणार ३० कोटी डोज

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -