घरदेश-विदेशNDA कुणाची संपत्ती नाही - संजय राऊत

NDA कुणाची संपत्ती नाही – संजय राऊत

Subscribe

NDA अर्थात राष्ट्रीय लोकशाही आघाडी कुणा एका पक्षाची मालमत्ता नाही अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला राफेल करारावरून पुन्हा एकदा लक्ष्य केलं आहे.

NDA अर्थात राष्ट्रीय लोकशाही आघाडी कुणा एका पक्षाची मालमत्ता नाही अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला राफेल करारावरून पुन्हा एकदा लक्ष्य केलं आहे. राफेल करारामध्ये कोणत्याही प्रकारचा घोटाळा झालेला नसेल तर नरेंद्र मोदी सरकारला कोणत्याही प्रकारे घाबरण्याची गरज नाही. त्यांनी जेपीसी द्वारे होणाऱ्या चौकशीला सामोरं जावे. असा पुनरूच्चार शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलत असताना त्यांनी राफेल करारावरून भाजपला लक्ष्य केलं. राफेल करार हा देशाच्या सुरक्षेशी संबंधित आहे. त्यामुळे सरकारला प्रश्न विचारण्यात गैर काय? असा सवाल देखील यावेळी राऊत यांनी केला आहे. शिवाय, ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणाची देखील सखोल चौकशी करावी अशी मागणी देखील यावेळी संजय राऊत यांनी केली आहे. बुधवारी लोकसभेमध्ये राफेल करारावर चर्चा सुरू होती. त्यावेळी शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी जेपीसी चौकशीची मागणी केली. त्यावर विचारले असता त्यामध्ये गैर ते काय? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

वाचा – Rafale deal : मोदींनी संसदेतून पळ काढला – राहुल गांधी

राम मंदिरावरून देखील सरकार लक्ष्य

रामाचं नाव घेत सरकार सत्तेत आलं. पण, सत्तेत आल्यानंतर मात्र सरकारला राम मंदिराचा विसर पडला आहे. यावेळी कायदा हा रामापेक्षा मोठा आहे का? असा सवाल देखील संजय राऊत यांनी केला आहे. शिवाय, हिंदुत्ववादी सरकार सत्तेत असताना राम मंदिर बांधलं जाणार नसेल तर ते केव्हा बांधणार? असा सवाल देखील त्यांनी यावेळी भाजप अर्थात नरेंद्र मोदी सरकारला केला आहे. राम मंदिराच्या मुद्यावर मतं मागितली गेली. त्यामुळे २०१९च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राम मंदिराच्या बांधकामाला सुरूवात करावी. त्यामुळे जातीचं राजकारण होणार नाही. अशा शब्दात संजय राऊत यांनी राम मंदिराच्या मुद्यावरून सरकारला पुन्हा एकदा लक्ष्य केलं आहे.

वाचा – Rafale deal : सरकार जेपीसी चौकशीला का घाबरतं? – शिवसेना

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -