घरदेश-विदेशRafale deal : सत्तेत आल्यानंतर राफेल कराराची चौकशी - राहुल गांधी

Rafale deal : सत्तेत आल्यानंतर राफेल कराराची चौकशी – राहुल गांधी

Subscribe

सत्तेत आल्यानंतर राफेल कराराची चौकशी करू असं आश्वासन काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिली आहे.

राफेल करारावरून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी सत्तेत आल्यानंतर राफेल कराराची चौकशी करू असं आश्वासन दिलं आहे. शिवाय, जे दोषी आढळतील त्यांना शिक्षा देखील केली जाईल असा सरळ इशारा भाजपला दिला आहे. सध्या राफेल कारारवरून काँग्रेसनं सत्ताधारी भाजपला धारेवर धरलं असून जास्त किमतीनं राफेल विमानांची खरेदी केल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. संसदेच्या बाहेर पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सरळ आव्हान भाजपला दिलं आहे. पंतप्रधान माझ्या प्रश्नांना उत्तरं द्यावी लागतील म्हणून लांब पळत आहेत. तर, अर्थमंत्री देखील माझ्या कोणत्याही प्रश्नांना उत्तरं देत नाहीत. तर, संरक्षण मंत्र्यांनी आता आमच्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत अशी मागणी आता राहुल गांधी यांनी केली आहे. यावेळी राहुल गांधी यांनी एका राफेल विमानाची किंमत ५२६ कोटी असताना ती १६०० कोटी कुणी केली असा सवाल केला आहे. तसेच, भारतीय हवाई दल, संरक्षण मंत्री आणि पंतप्रधान यांच्यापैकी जबाबदार कोण? १२६ राफेल विमानांची गरज असताना २६ राफेलची खरेदी का? तर, अनिल अंबानी यांना कंत्राट कुणी दिलं? असा सवाल देखील राहुल गांधी यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

वाचा – राफेल प्रकरण- राहुल गांधींनी पुन्हा साधला सरकारवर निशाणा

संरक्षण मंत्र्यांचं उत्तर 

संरक्षणमंत्री निर्मला सीतारामण यांनी काँग्रेसनं केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं. यावेळी त्यांनी युपीए सरकार राफेलच्या खरेदीबाबत उदासिन होतं. शिवाय, त्याची किंमत देखील जास्त होती. पण, भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर राफेल विमान खरेदीमध्ये गती आली. शिवाय, युपीएपेक्षा ९ टक्के कमी दरानं राफेल विमानांची खरेदी केली गेली. अशा शब्दात संरक्षण मंत्री निर्मला सीतारामण यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली.

वाचा – राफेल प्रकरण- राहुल गांधींनी पुन्हा साधला सरकारवर निशाणा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -