घरमहाराष्ट्रराज ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं तर सावधान!

राज ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं तर सावधान!

Subscribe

पुण्याच्या एका तरुणाने राज ठाकरेंवर आक्षेपार्ह कमेंट केली म्हणून मनसैनिकांनी त्याला शोधून शिक्षा दिली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या तरुणाला कमेंट करणे फार महागात पडले आहे. या तरुणाला मनसेच्या कार्यकर्त्यांनी ५० उठाबशा काढण्याची शिक्षा दिली आहे. यासंबंधी एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये मनसैनिक एका तरुणाला उठाबशा घालायला लावत आहेत. त्याशिवाय, या तरुणाला मनसैनिकांनी माफी मागायला लावली आहे.

हेही वाचा – मनसेचा भाजपला टोला; ‘तुमची हवा बदलतेय हे लक्षात घ्या’

- Advertisement -

काय आहे प्रकरण?

राज ठाकरे यांच्या फेसबुक पेजवर कमेंटमध्ये एका तरुणाने आक्षेपार्ह लिहिले होते. त्यामुळे संतप्त झालेल्या मनसैनिकांनी या तरुणाला शोधून काढले आणि त्याला माफी मागायला भाग पाडलं आहे. यासंबंधी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये मनसैनिक तरुणाला ५० उठाबशा काढायला सांगत आहेत. त्याचबरोबर त्याला माफी देखील मागायला लावत आहे. तरुणाने राज ठाकरे आणि मनसैनिकांची माफी मागितली आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी मुलाला यापुढे असं काही केले तर सोडणार नाही असे सांगितले आहे. त्याचबरोबर हा मुलगा मराठी, गरीब घरातला आणि त्याचे वडील वारले आहेत म्हणून मारत नसल्याचे मनसैनिकांनी व्हिडिओमध्ये म्हटले आहे. या तरुणाने राज ठाकरे आणि मनसेच्या सर्व कार्यकर्त्यांची माफी मागितली. हा मुलगा करमाळ्याचा आहे. हा मुलगा मुळचा सातरा जिल्ह्याच्या करमाळा तालुक्याचा आहे. तो शिक्षणासाठी पुण्यात आला असून तो पुण्यात वास्तव्यास आहे.

- Advertisement -

हेही वाचा –  मोदींची ती मुलाखत ‘मॅनेज’; राज ठाकरेंची व्यंगचित्रातून टीका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -