घरदेश-विदेशमोदींची नक्की भूमिका काय? राहुल गांधींचा सवाल

मोदींची नक्की भूमिका काय? राहुल गांधींचा सवाल

Subscribe

कोरोना लसीवरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकार वर हल्ला बोल.

कोरोना लसीवरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकार वर हल्ला बोल केला आहे. या संदर्भात त्यांनी एक ट्विट केले आहे. ‘बिहार निवडणूकांच्या वेळी सगळ्यांना कोरोना लस देण्याची घोषणा करण्यात आली. आता मोदी सरकार लस सगळ्यांना देणार नाहीत असे म्हणत आहेत. मोदी सरकारची नक्की भूमिका काय? असे त्यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे. मोदी सरकारची नक्की भूमिका काय? असा सवाल राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांना केला आहे.

- Advertisement -

जगभरात कोरोना लसीवर संशोधन सुरू आहे. केंद्र सरकारने कोरोनावरील कोणत्याही लसीला अद्याप मंजूरी दिली नाही. तब्बल ३० कोटी लोकांना कोरोना लस देण्याची तयारी केली जात आहे. सरकारकडून प्रत्येक भारतीयाला कोरोना लस देणार असल्याचे म्हटले गेले आहे. ‘सर्वांना कोरोनालस देण्याचे पंतप्रधान मोदींनी म्हटले पण हे सरकारने म्हणतेय असे मी म्हणालो नाही असे मोदी म्हणाले, मोदींची नक्की भूमिका काय?’ असे म्हणून राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निषाणा साधला.

गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत शेतकऱ्यांचे चाललेल्या आंदोलन सुरू आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपला एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत मोदी सरकारवर हल्लाबोल केला. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून झूठ की,लूट की,सूट-बूट की सरकार असे ट्विट लिहून मोदी सरकारवर टिकास्त्र सोडले. त्यानंतर पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर निषाणा साधला आहे.

- Advertisement -

आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी दिल्ली, केरळ,महाराष्ट्र आणि राजस्थान या चार राज्यांसाठी तयारी करण्यास सांगितले आहे. या चार राज्यांत कोरोनामुळे सर्वात जास्त लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोना लस आल्यानंतर ती सर्वात आधी कोरोना वॉरिअर्सना दिली जाणार आहे. त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणार आहे.


हेही वाचा – गुडन्यूज! कोरोना लसीला वर्षाच्या अखेरीस मिळणार मंजूरी – AIIMS

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -