घरदेश-विदेशराहुल गांधी पंतप्रधानपदाच्या रेसमध्ये नाहीत?

राहुल गांधी पंतप्रधानपदाच्या रेसमध्ये नाहीत?

Subscribe

लोकसभा निवडणुकीपूर्वी राहुल गांधी काँग्रेसकडून पंतप्रधानपदाचे उमेदवार नसतील असे पी. चिदंबरम यांनी म्हटले आहे. त्यामुळे राहुल गांध पंतप्रधानपदाचे उमेदवार असणार की नाही ? यासाठी निकालपर्यंतची वाट पाहावी लागणार आहे.

२०१९च्या लोकसभा निवडणुकीसाठी आता सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. त्यात काँग्रेसकडून पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसाठी राहुल गांधी यांच्या नावाची चर्चा जोरात सुरू होती. पण, निवडणुकीपूर्वी राहुल गांधी पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून काँग्रेस घोषणा करणार नसल्याचे माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी सांगितले आहे. भाजप विरोधात लढण्यासाठी सध्या काँग्रेसनं कंबर कसली आहे. त्यासाठी प्रादेशिक पक्षांशी देखील चर्चा सुरू आहेत. अशा वेळी पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसाठी राहुल गांधी यांच्या नावाची चर्चा जोरात सुरू होती. पण, पी. चिदंबरम यांनी तूर्तात तरी या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. पी. चिदंबरम हे न्युज १८ नेटवर्कशी बोलत होते. दरम्यान, निवडणुकीचे बिगुल वाजले असून काँग्रेससह भाजप देखील आता जोरदार प्रचार करत असल्याचे दिसत आहे.

भाजप विरूद्ध काँग्रेस?

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि भाजपनं आता कंबर कसली आहे. काहीही करून भाजपला पराभूत करायचं यासाठी काँग्रेसनं कंबर कसली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील सध्या देशभर प्रचार दौरे सुरू केले आहेत. यावेळी राहुल गांधी भाजपवर टीकास्त्र करताना देखील दिसत आहेत. त्यामुळे पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसाठी राहुल गांधी हे प्रबळ दावेदार मानले जात होते. पण, पी. चिदंबरम यांनी त्यावर पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. सध्यस्थितीमध्ये काँग्रेस  देखील प्रादेशिक पक्षांशी चर्चा करताना दिसत आहेत. यावेळी भाजपला प्रादेशिक पक्षांनी साथ देऊ नये यासाठी भाजप प्रयत्न करत असल्याचा आरोप चिदंबरम यांनी केला आहे.

- Advertisement -

वाचा – राहुल गांधींनी लोकसभा निवडणुकीसाठी कंबर कसली

काँग्रेसकडून पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण?

राहुल गांधी नाहीत तर काँग्रेसकडून पंतप्रधानपदाचे उमेदवार कोण? असा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेल नाही का? तर थोडं थांबा. कारण पी. चिदंबरम यांनी निवडणुकीपूर्वी राहुल गांधी पंतप्रधानपदाचे उमेदवार नसतील असे म्हटले आहे. सध्या काँग्रेस विविध राजकीय पक्षांशी युतीसाठी बोलणी करत आहे. त्यावेळी राहुल गांधींचे नेतृत्व स्वीकारण्यास कुणी तयार होईल का? असा प्रश्न सध्या काँग्रेसला पडला आहे. शिवाय शरद पवारांसारखे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांचे नेतृत्व स्वीकारतील का? हा देखील प्रश्न आहे. त्यामुळे चर्चेमध्ये बाधा येण्याची दाट शक्यता लक्षात घेता. निवडणुकीपू्वी राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर करणं काँग्रेसला परवडणारे नाही. त्यासाठी सध्या काँग्रेस सावध भूमिका घेताना दिसत आहे.

वाचा – देश का चौकीदार चोर है : राहुल गांधी

वाचा – राहुल गांधी पाकिस्तानला मदत करत आहेत – रवीशंकर प्रसाद

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -