घरCORONA UPDATEभारताला दिवसाला किमान २० लाख टेस्ट कराव्या लागतील - रघुराम राजन!

भारताला दिवसाला किमान २० लाख टेस्ट कराव्या लागतील – रघुराम राजन!

Subscribe

देशात कोरोनाचा फैलाव अजूनही धिम्या गतीवर ठेवल्याबद्दल एकीकडे दिलासादायक चित्र असतानाच दुसरीकडे रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर आणि अर्थतज्ज्ञ रघुराम राजन यांनी वेगळीच भीती व्यक्त केली आहे. ‘भारत आत्ता दिवसाला फक्त २५ ते ३० हजार टेस्ट करत आहे. अमेरिकेत त्याच २० लाख टेस्ट दिवसाला होत आहेत. आपल्यालाही तेवढ्याच टेस्ट कराव्या लागतील’, असं रघुराम राजन म्हणाले आहेत. काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी आज रघुराम राजन यांच्याशी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातल्या आर्थिक स्थितीविषयी ऑनलाईन व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा केली. यावेळी त्यांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले. या चर्चेचा हा संकलित भाग…

राहुल गांधी : कोरोनाच्या टेस्ट कमी होतायत असं म्हणतात. तुम्हाला काय वाटतं?

- Advertisement -

रघुराम राजन : आपल्याला मोठ्या प्रमाणावर टेस्टिंग करावं लागेल. मास टेस्टिंगच्या माध्यमातून हे शक्य आहे. सध्या आपण फक्त २५ ते ३० हजार टेस्ट दिवसाला करत आहोत. आपल्याला किमान २० लाख टेस्ट दिवसाला कराव्या लागतील. मास टेस्टिंगमधून एक हजार सॅम्पलच्या आधी टेस्ट घेतल्या, तर त्यातून कुठल्या भागांवर लक्ष केंद्रित करायचंय, ते स्पष्ट होईल. त्यातून पुढे टेस्ट करता येतील.

रा.गा. : लॉकडाऊन उठल्यानंतर कशा पद्धतीने गोष्टी करायला हव्यात?

- Advertisement -

र. रा. : लॉकडाऊन उघडल्यानंतर आपण काळजी घेतली पाहिजे की नवीन सापडणाऱ्या रुग्णांना आयसोलेट केलं जाईल. जर दुसरा लॉकडाऊन उठल्यानंतर उद्योगधंदे पुन्हा सुरू झाले आणि पुन्हा तिसरा लॉकडाऊन लागू करावा लागला, तर ते देशासाठी धोकादायक ठरेल. अर्थव्यवस्थेसाठी गंभीर असेल.

रा.गा. : कोरोनाचा भारतीय अर्थव्यवस्थेवरचा परिणाम कसा पाहाताय?

र. रा. : आपल्याला प्राथमिकता ठरवावी लागेल. आपल्याकडे पाश्चात्य देशांपेक्षा कमी संसाधनं आहेत. त्यामुळे अर्थव्यवस्था कशी गतिमान राहील, हे पाहावं लागेल. सगळ्यात महत्त्वाचं, लोकांना आरोग्यदायी आणि जिवंत ठेवावं लागेल. ही परिस्थिती न भूतो न भविष्यती अशी हाताळावी लागेल. या परिस्थितीत आधी आरोग्यविषयक बाबी कराव्या लागतील. त्यानंतर चांगली शिक्षण पद्धती, चांगली आरोग्य व्यवस्था निर्माण करावी लागेल. नव्या रोजगाराच्या संधी कशा निर्माण होतील, याकडे लक्ष द्यायला हवं.

रा.गा. : बेरोजगारीचं पुढच्या काळात काय होईल?

र. रा. : ही एक काळजी वाढवणारी समस्या आहे. अंदाजे १० कोटी लोकं बेरोजगार होतील. हे आकडे भयानक आहेत. आपल्याला चौकटीच्या बाहेर जाऊन प्रयत्न करावे लागतील. आपल्याकडे दीर्घकाळ सगळ्यांना सामावून घेण्याची क्षमता नाही. त्यामुळे नव्या पद्धतीने उपाय योजावे लागतील. रोजगाराचे नवे पर्याय शोधावे लागतील.

रा.गा. : मजुरांची परिस्थिती जास्त बिकट आहे. त्यांच्या रोजगाराचं काय?

र. रा. : आपल्याकडे वेगवेगळ्या योजना आहेत. या लोकांकडे रोजगार नाही. आपल्याला त्यांना सरकारी योजनांच्या माध्यमातून मदत करावी लागेल. पण प्राथमिकता सध्या लोकांना जिवंत ठेवणं आणि आरोग्यदायी ठेवणं याला द्यायला हवी. सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या माध्यमातून शक्य तितक्या गरीबांना अन्नधान्य वितरण करता येईल.

रा.गा. : गरीबांच्या मदतीसाठी भारतात किती पैसे लागतील?

र. रा. : ६५ लाख कोटी तरी लागतील. आपला जीडीपी २०० लाख कोटी आहे. त्यामुळे इतकी रक्कम आपल्यासाठी जास्त नाही.

रा.गा. : यानंतर कसं जग बदलेल?

र. रा. : भारत काही बाबतीत या परिस्थितीचा फायदा घेऊ शकतो. या संकटातून जगभरात नव्यानं अर्थव्यवस्था विचार करायला लागतील. भारतासाठी अशा परिस्थितीत या जागतिक विचारप्रक्रिया आणि चर्चेमध्ये नेतृत्व करण्याची संधी आहे. भारताने कोरोनाच्या या संकटाकडे जागतिक संधी म्हणून पाहावं!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -