Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश केंब्रिज विद्यापीठात राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा; माझी हेरगिरी होत असल्याचा आरोप

केंब्रिज विद्यापीठात राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा; माझी हेरगिरी होत असल्याचा आरोप

Subscribe

नवी दिल्ली : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी काल, गुरुवारी परदेशात पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. लंडनच्या कैब्रिज विद्यापीठात एमबीएच्या विद्यार्थ्यांना व्याख्यान देताना राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. भारतात लोकशाही धोक्यात असल्याचे मतही राहुल गांधी यांनी यावेळी व्यक्त केले.

राहुल गांधी यांनी आपली हेरगिरी करण्यात आल्याचा आरोप मोदी सरकारवर करत गुप्तचर अधिकाऱ्यांनी त्यांना फोनवर सावधगिरी बाळगत बोलण्याचा सल्ला दिल्याचे सांगितले. तसेच भारतातील सर्व संस्थांवर सरकारचा कब्जा असल्याचेही त्यांनी सांगितले. माध्यमे आणि न्यायालयांवरही सरकारचे नियंत्रण असून लोकशाहीचा मोदी सरकारने खेळ चालवला जात असल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी यावेळी केला.

- Advertisement -

राहुल यांनी याआधीही लंडन, जर्मनी, अमेरिकेसह अनेक देशांत भाजपा सरकारच्या विरोधात वक्तव्ये केली आहेत. २०२२ मध्येही केंब्रिज विद्यापीठात व्याख्यान देताना राहुल गांधी यांनी भारताची तुलना पाकिस्तानसोबत केली होती. यामुळे नंतर बराच वाद झाला होता.

https://twitter.com/ani_digital/status/1631492940148408322

- Advertisement -

केंब्रिजमध्ये राहुल गांधी काय म्हणाले –
केंब्रिज विद्यापीठात बिझनेस स्कूलच्या विद्यार्थ्यांना काल, गुरुवारी संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, भारतात माध्यमे आणि न्यायव्यवस्था सरकारच्या नियंत्रणात आहे. माझ्या फोनवर पेगासस सॉफ्टवेअर होते, ज्याद्वारे माझी हेरगिरी करण्यात आली. तुमचा फोन रेकॉर्ड होत असल्याचे गुप्तचर अधिकाऱ्यांनी मला सांगितले. तसेच विरोधी पक्षातील अनेक नेत्यांवर गुन्हे आहेत, माझ्यावरही गुन्हे दाखल आहेत. अशा प्रकरणात गुन्हे दाखल आहेत, जे आम्ही कधी केलेच नाहीत. त्यामुळे आम्ही स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न करत आहोत, असे ते म्हणाले.
‘लर्निंग टू लिसेन इन इन 21 सेंचुरी’ या विषयावर व्याख्यान देताना राहुल गांधी म्हणाले की, लोकशाही मूल्यांशी जे जोडले गेले नाही, असे जग निर्माण होत असल्याचे आपण पाहू शकत नाही. जगात लोकशाही मूल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी नव्या विचारांची गरज आहे, त्यामुळे ते तुम्ही कोणावरही लादू शकत नाही, असे त्यांनी सांगितले.
भारत आणि अमेरिकेसारख्या लोकशाही देशातील उत्पादन क्षेत्रांतील घसरणीचा उल्लेख करताना राहुल गांधी म्हणाले की, या बदलामुळे मोठ्या प्रमाणात असमानता आणि नाराजी समोर आली आहे, ज्यावर त्वरित लक्ष देण्याची आणि संवादाची गरज आहे.

भारत जोडो यात्रेचाही उल्लेख
केंब्रिज विद्यापीठातील व्याख्यानात राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेसंबंधी अनेक गोष्टी सांगितल्या. काश्मीरबद्दल बोलताना राहुल गांधी म्हणाले की, काश्मीर गेल्या अनेक वर्षांपासून हिंसाचाराने ग्रासले आहे. सुरक्षा अधिकाऱ्यांनी सुरक्षेच्या दृष्टीने मला तिथे न जाण्याचा इशारा दिला होता, पण भारत जोडो यात्रा काश्मीरमध्ये पोहोचल्यावर हजारो लोक तिरंगा घेऊन पुढे आले. एक व्यक्ती माझ्याजवळ आली, तिने काही मुलांकडे हात दाखवून सांगितले की, ते अतिरेकी आहेत. ती मुले माझ्याकडे एकटक पाहत होती, पण ती काहीच करू शकली नाहीत. लोकांचे ऐकण्याची आणि अहिंसेची ही ताकद असल्याचेही राहुल गांधी म्हणाले.

- Advertisment -