घरदेश-विदेशदिल्ली मिळवण्यासाठी राहुल यांची यात्रा, तर भाजपची प्लान १४४ ची खेळी

दिल्ली मिळवण्यासाठी राहुल यांची यात्रा, तर भाजपची प्लान १४४ ची खेळी

Subscribe

एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप २०२४ च्या निवडणुकीत विजयाची हॅटट्रीक मिळवून इतिहास रचण्याचे स्वप्न पाहत आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने देखील मोदींचा विजयरथ रोखण्यासाठी कंबर कसली आहे.

एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप २०२४ च्या निवडणुकीत विजयाची हॅटट्रीक मिळवून इतिहास रचण्याचे स्वप्न पाहत आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने देखील मोदींचा विजयरथ रोखण्यासाठी कंबर कसली असून आजपासून भारत जोडो यात्रेचा शुभारंभ केलाय.  भाजपनेही २०२४ निवडणुका डोळ्यासमोर ठेवत १४४ जागांसाठी स्पेशल प्लान आखला आहे.

आगामी लोकसभा निवडणुकांसाठी दोन वर्षांचा कालावbjpधी उरला आहे. याचपार्श्वभूमीवर भाजपकडून नवी रणनिती आखण्यात येत असून सरकारमधील मंत्र्यांवर विशेष जबाबदारी सोपवण्यात येत आहे. तर विरोधी पक्षही कामाला लागला असून भाजपला रोखण्यासाठी देशभरात मेगा रॅलीच्या योजना आखल्या जात आहेत. यासाठी भाजप विरोधी विविध पक्ष एकटले आहेत. राहुल गांधी, ममता बॅनर्जी , नीतीश कुमार. अखिलेश यादव, केसीआर असे अनेक दिग्गज यात उतरले आहेत. यातील काहीजणांनी सोबतीने तर काहींनी एकला चलो रे भूमिका घेतली आहे. याचपार्श्वभूमीवर सर्वात मोठा विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने भारत जोडो यात्रा सुरू केली आहे. सर्वच विरोधकांनी भाजपविरोधात एकत्र रणशिंग फुंकल्याने भाजपसाठी वरवर पाहता सोपी वाटणारी विजयाची वाट बिकट असण्याचीच शक्यता अधिक आहे. यामुळे यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याच हाती मोदींनी भाजपचे सारथ्य दिले आहे.

- Advertisement -

भाजपसाठी २०१९ च्या तुलनेत सध्याची परिस्थिती बदललेली आहे. गेल्या तीन वर्षात एनडीएमधील अनेक सहकारी पक्षांनी वेगळी वाट धरली आहे. यात शिवसेना सर्वात आधी एनडीएमधून बाहेर पडली. त्यानंतर शिरोमणी अकाली दलानेही शिवसेनेच्या पावलावर पाऊल टाकत भाजपला सोडचिट्ठी दिली. आता तर नीतीश कुमार यांनीही भाजपविरोधात विरोधी पक्षांबरोबर हातमिळवणी केली आहे. विरोधी पक्षांच्या या खेळीमुळे राज्याराज्यात सर्वाधिक जागांवर विजय मिळवण्याचे आवाहन भाजपसमोर आहे. कारण परिस्थिती बदलल्याने गेल्यावेळे प्रमाणेच सर्वाधिक जागांवर विजयी मोहोर उमटवणं आता भाजपसाठी सोपं राहीलं नाहीये. राजस्थान, गुजरात, हरियाणा, दिल्ली, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, त्रिपुरा, अरुणाचल यासारख्या ८ राज्यांमध्ये सर्वच जागांवर भाजपची सत्ता आहे. तसेच ५० टक्के मतदार भाजपचेच आहे.

तसेच सध्या भाजपच्या विजयी मेरुला रोखण्यासाठी विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. तर भाजपने विरोधकांना जशास तसे उत्तर देण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांवर महत्वाची जबाबदारी सोपवली आहे. जिकंलेल्या जागांवर वरचष्मा कायम ठेवत गेल्या निवडणुकीत ज्या जागांवर विजय मिळवता आला नाही त्यांवर भाजपचे लक्ष असणार आहे. अशा १४४ जागांवर मोर्चाबांधणी करण्याची जबाबदारी भाजपने मंत्र्यावर सोपवली आहे. यातील काही जागांवर गेल्या निवडणुकीत भाजपला पराभव स्विकारावा लागला होता. ज्या जागांसाठी भाजपने १४४ प्लान आखला आहे त्यात महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, तेलंगाना, पंजाब, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, बिहार, तमिळनाडू यासारखी राज्य आहेत. यात प्रामुख्याने पश्चिम बंगालव्यातिरिक्त अधिक जागा या दक्षिण भारतातील राज्यातील आहेत. यात केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि तमिळनाडूत भाजपला फक्त ३० जागांवर विजय मिळाला होता.

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -