घरदेश-विदेशरेल्वेमध्ये अनेक व्यवसायाच्या संधी, खासगी क्षेत्राला आमंत्रण - रेल्वेमंत्री गोयल

रेल्वेमध्ये अनेक व्यवसायाच्या संधी, खासगी क्षेत्राला आमंत्रण – रेल्वेमंत्री गोयल

Subscribe

खासगी क्षेत्रासाठी रेल्वेमध्ये बऱ्याच संधी निर्माण होणार

‘खासगी क्षेत्र अनेक मार्गाने सहकार्य करू शकते. खाजगी कंपन्यांनी ज्या मार्गावर आपल्याला रेल्वे सेवा सुरू करायची आहे, ते मार्ग निश्चित करा’, असे रेल्वे मंत्री पियुष गोयल एका उद्योग संस्था सीआयआयने आयोजित केलेल्या ऑनलाइन कार्यक्रमात म्हणाले. ते म्हणाले, तुमची इच्छा असेल तर आम्ही तुमच्याबरोबर नवी गुंतवणूक करण्यासही तयार असून आम्ही वाहतूक मार्ग भाड्याने देण्यास तयार आहोत, आम्ही पार्सल गाड्या भाड्याने देण्यास तयार आहोत. त्यामुळे खासगी क्षेत्रासाठी रेल्वेमध्ये बऱ्याच संधी निर्माण होणार आहेत. ‘

रेल्वेमंत्री म्हणाले की, जमीन खरेदीचे आव्हान नसल्यामुळे खासगी क्षेत्र राष्ट्रीय महामार्गालगतच्या एलिव्हेटेड कॉरिडॉरचा विचार करू शकणार आहे. यासह रविवारी रेल्वेने गेल्या वर्षीच्या २१ जून रोजी सुमारे ९५ टक्के मालवाहतूक केली आहे. ते म्हणाले, ‘२१ जून २०१९ च्या तुलनेत आम्ही फक्त पाच टक्क्यांनी खाली होतो. जूनच्या संपूर्ण महिन्यावर नजर टाकल्यास १ जून ते २१ जून या कालावधीत आम्ही भाड्याच्या बाबतीत आठ टक्क्यांनी खाली आहोत. जुलै पर्यंत आम्ही ती बरोबरी करू यासह आम्ही ऑगस्ट ते सप्टेंबर पर्यंत वाढीची अपेक्षा करत आहोत.

- Advertisement -

रेल्वेने ४ हजार ५५३ मजुरांसाठी विशेष गाड्या चालवल्या

रेल्वे मालगाडीच्या सरासरी वेगाबद्दल ते म्हणाले की, गेल्या वर्षी २१ जूनला ते ताशी २२.९८ किमी होते आणि रविवारी ते ताशी ४१. ७४ किमी होते. यावरून भविष्यात ही मालवाहतूक स्वस्त होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. गोयल म्हणाले, ‘आम्ही बहुप्रतिक्षित देखभाल कार्ये पूर्ण करण्यासाठी सुज्ञतेने या वेळेचा उपयोग करीत आहोत. त्याव्यतिरिक्त, त्यांनी असे सांगितले की, रविवारपर्यंत भारतीय रेल्वेने ४ हजार ५५३ मजुरांसाठी विशेष गाड्या चालवल्या असून आता त्यांची संख्या सातत्याने कमी होत आहे.

आतापर्यंत सुमारे ७५ लाख मजुरांनी केला प्रवास

‘३१ मे ते २१ जून या कालावधीत दहा टक्क्यांनी घट झाली आहे. रविवारी अशाच तीन गाड्या चालविण्यात आल्या. त्यांची मागणी संपली आहे. ज्यांना घरी परत जायचे होते त्यांना आम्ही सुखरूप घरी पोहोचवले आहे. आतापर्यंत सुमारे ७५ लाख प्रवासी मजुर कामगार या गाड्यांनी प्रवास केला आहे, असे देखील रेल्वे मंत्री म्हणालेत.


चिनी कंपन्यांना झटका! राज्य सरकारने ५००० कोटींच्या तीन करारांना दिली स्थगिती
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -