घरमुंबईमहापालिका कर्मचाऱ्यांसाठी बस सेवा सुविधा बंद

महापालिका कर्मचाऱ्यांसाठी बस सेवा सुविधा बंद

Subscribe

रेल्वे लोकल सेवा ही केवळ जलद मार्गावरूनच धावत आहेत. त्यातही या सेवा अपुऱ्या असतानाच महापालिकेने बस सेवा बंद केल्याने कर्मचाऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे.

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी रेल्वे लोकल सुरु झाल्याने महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी सुरु करण्यात आलेल्या बेस्ट बसेसच्या सुविधा आता बंद करण्यात आल्या आहे. मात्र, रेल्वे लोकल सेवा ही केवळ जलद मार्गावरूनच धावत आहेत. त्यातही या सेवा अपुऱ्या असतानाच महापालिकेने बस सेवा बंद केल्याने कर्मचाऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे महापालिकेने जोखीम भत्ता बंद करावा, पण रेल्वे सेवा सुरळीत होईपर्यंत ही बस सेवा सुरु ठेवावी,अशी मागणी कामगार,कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे.

मुंबईत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक-डाऊन सुर झाल्यानंतर लोकल रेल्वे सेवा बंद करण्यात आल्याने महापालिकेच्या अत्यावश्यक सेवांच्या कर्मचाऱ्यांसाठी महापालिका मुख्यालय, विभाग कार्यालय आणि रुग्णालय आदी ठिकाणांहून बेस्ट व एस.टी बसेसची सुविधा उपलब्ध करून दिली होती. परतु मागील आठवड्यापासून रेल्वे लोकल सेवा अत्यावश्यक सेवा सुरु झाल्यानंतर, सोमवारपासून बेस्ट बसेस सेवा बंद करण्यात आल्या आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागला आहे.

- Advertisement -

रेल्वेची अत्यावश्यक रेल्वे सेवा ही केवळ जलद मार्गावरूनच धावत असू कर्जत कसारा येथे धावणाऱ्या लोकल या तीन ते चार तासांनी आहेत. तसेच जलद मार्गावरून ही सेवा असल्याने मधल्या स्थानकांवर उतरणाऱ्या प्रवशांना पर्यायी वाहनांची व्यवस्था करत घर गाठावे लागत आहे. त्यामुळे रेल्वे लोकल पेक्षा बेस्ट बसेसची सुविधा हीच कर्मचाऱ्यांसाठी उपयुक्त ठरत आहेत. रेल्वे लोकल सुरु असली तरी आधीच गैरसोय होत असतानाच आता बेस्ट बसेस बंद केल्यामुळे कर्मचाऱ्यांना कार्यालयात पोहोचताना तसेच घर गाठताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

महापालिका कर्मचाऱ्यांनी याबाबत प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. रेल्वे लोकल या अर्ध्या तासाने एक आहे आणि त्यातही महिलांच्या डब्यात एका सिटवर तीन तर पुरुषांच्या डब्यात एका सिटवर दोन अशाप्रकारे प्रवाशी बसतात. तर बाकीचे प्रवाशी मधल्या मोकळ्या जागेत उभे असतात. त्यामुळे या लोकल प्रवासातून कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढण्याची भीती अधिक आहे. तसेच बेस्ट बसेसमधून नेमकेच कर्मचारी जात असल्याने कोरेानाचा संसर्ग होण्याचे प्रमाण कमी आहे. ज्या बेस्ट बसेस सुरु आहेत, त्यातून सुरक्षित आणि इच्छित स्थळी पोहोचण्यास मदत होते. त्यामुळे या बसेस बंद करू नये. हवे असल्यास प्रशासनाने जोखीम भत्ता बंद करावा,परंतु रेल्वे लोकल सेवा सुरळीत होईपर्यंत बेस्ट बसेस सुरु ठेवल्या जाव्यात,अशीही मागणी त्यांनी दिली.

- Advertisement -

रेल्वे लोकल अत्यावश्यक सेवांसाठी सुरु झाल्यानंतर महापालिकेच्या सुचनेनुसार ज्या डेडिकेटेड सेवेसाठी बसेस होत्या , त्या टप्प्याटप्प्याने बंद करण्यात येत आहे. आता या सेवा फिडर रुटला वापरण्यात येत असल्याचे बेस्टचे उपजनसंपर्क अधिकारी मनोज वराडे यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -