घरदेश-विदेशनिर्दयी! उंटाचे तोडले पाय; रस्त्याच्या कडेला ४ दिवस तडफडत होता उंट

निर्दयी! उंटाचे तोडले पाय; रस्त्याच्या कडेला ४ दिवस तडफडत होता उंट

Subscribe

गेल्या काही दिवसांमध्ये केरळमधील हत्तीणींला फटाक्यांचे अननस खायला घातल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. यावर संपूर्ण देशातून सोशल मीडियाच्या माध्यमातून संताप व्यक्त झाला होता. आता राजस्थानमधील एका जखमी उंटाची घटना समोर येत आहे. या उंटाचा पाय तोडून त्याला तसेच सोडून दिल्याचे आढळून आले आहे. जैसलमेरमधील एका गावातील ही घटना आहे. काही अज्ञातांनी उंटाला क्रूरतेने मारहाण करत त्याचे पाय तोडले. त्यानंतर जखमी अवस्थेतील हे उंट चार दिवस रस्त्याच्या कडेला पडून होते. अखेर प्रशासनाने ते उंट हॉस्पिटलमध्ये नेले.

जैसलमेर येथील थानांतर्गत बेतीना गावात ही घटना घडली. या घटनेमुळे पशूप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. गेल्या तीन दिवसांपूर्वीची ही घटना आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घटनेनंतर हे उंट जखमी अवस्थेत कण्हत होते. तिचा आवाज दूरपर्यंत ऐकू येत होता. परंतू पशूपालन विभाग किंवा प्रशासनाने त्याची त्वरीत दखल घेतली नाही. इतकेच काय तर या प्रकरणी कोणतीही कारवाईही केलेली नाही. उंटच्या मालकाने याप्रकरणी अज्ञात लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर बुधवारी सांकडा पोलीस टीम घटनास्थळी दाखल झाली.

- Advertisement -

हेही वाचा –

सोन सूद याचे Return Gift; मजुरांसाठी ३ लाख नोकऱ्यांची केली घोषणा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -