घरताज्या घडामोडीपहिल्या स्वदेशी विमानवाहू जहाजाची संरक्षण मंत्र्यांनी केली पाहणी; म्हणाले, 'समुद्रात वाढणार नौदलाची...

पहिल्या स्वदेशी विमानवाहू जहाजाची संरक्षण मंत्र्यांनी केली पाहणी; म्हणाले, ‘समुद्रात वाढणार नौदलाची ताकद’

Subscribe

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज, शुक्रवारी कोचीन शिपयार्ड लिमिटेडच्या दौऱ्यावर आहे. यादरम्यान त्यांनी येथे तयार केलेल्या पहिल्या स्वदेशी विमानवाहू जहाजाची (आयएसी) पाहणी केली. यावेळी ते म्हणाले की, पुढच्या वर्षी स्वदेशी विमानवाहू जहाजाचे प्रक्षेपण ही भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण करण्यासाठी खरी भेट असेल. विमान वाहकाची लढाई पोहोच देशाच्या संरक्षणात प्रचंड क्षमता जोडेल आणि समुद्री क्षेत्रामध्ये भारताचे हित सुरक्षित करण्यात मदत करेल.

दरम्यान आयएसीला आयएनएस विक्रांत नाव दिले जाईल. यावर्षी याचे समुद्र परीक्षण पूर्ण केले जाईल आणि पुढच्या वर्षी याची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. संरक्षण मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की, राजनाथ सिंह दौऱ्याच्या पहिल्या दिवशी गुरुवारी रात्री येथील दक्षिणी नौदल कमांडला पोहोचले. त्यांच्यासमवेश नौदलाचे प्रमुख एडमिरल करमबीर सिंह होते. दक्षिणी नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ वाइस एडमिरल एके चावला यांनी त्यांचे स्वागत केले.

- Advertisement -

आयएसी निर्माण करणाच्या प्रगतीचा आढावा घेतल्यानंतर केंद्रीय मंत्री दक्षिणी नौदल कमांडच्या काही महत्त्वाच्या प्रशिक्षण आस्थापनांना भेट दिली. त्यांना कमांडद्वारे सुरू असलेल्या महत्त्वपूर्ण प्रशिक्षण आणि परिचालन उपक्रमांची माहिती दिली.


हेही वाचा – विकसित जम्मू-काश्मीरच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -