घरदेश-विदेश'दिल्लीजले'..राजधानीत सर्वाधिक ४८ अंश तापमान!

‘दिल्लीजले’..राजधानीत सर्वाधिक ४८ अंश तापमान!

Subscribe

राजधानी दिल्लीमध्ये तापमानाचे सर्व विक्रम मोडीत निघाले असून सोमवारी दिल्लीत जून महिन्यातलं सर्वाधिक म्हणजेच तब्बल ४८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

एकीकडे तमाम मुंबईकर पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहात असताना दिल्ली मात्र भट्टीतल्या लोखंडाप्रमाणे तापायला लागली आहे. यंदा तर दिल्लीमध्ये विक्रमी तापमानाची नोंद झाली आहे. सोमवारी राजधानी दिल्लीमधल्या पालम वेधशाळेने तब्बल ४८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद केली. आत्तापर्यंत जून महिन्यातल हे सर्वाधिक तापमान ठरलं आहे. त्यामुळे दिल्लीकर भयंकर हैराण जाले असून वाढत्या तापमानाचा सामना करायचा कसा? असाच प्रश्न प्रत्येक दिल्लीकराला पडला असेल यात शंका नाही.


हेही वाचा – नाशकात १७ वर्षांतील तापमानाचा उच्चांक

२०१४मध्ये नोंदलं होतं सर्वाधिक तापमान

याआधी २०१४मधल्या ९ जून रोजी पालम वेधशाळेने नोंदवलेलं ४७.८ अंश सेल्सिअस हे तापमान आजपर्यंतचं सर्वाधिक तापमान होतं. पण सोमवारी हा विक्रम मोडत ४८ अंश सेल्सिअस या उच्चांकी तापमानाची नोंद दिल्लीमध्ये झाली. ‘पश्चिमेकडून येणारे कोरडे वारे आणि जूनमधलं भयंकर गरम वातावरण यासाठी कारणीभूत ठरलं आहे. तरीही, आग्नेयेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे दिल्लीच्या तापमानात एक किंवा दोन अंशांची घसरण होऊ शकते. मात्र उष्ण हवा कायम राहील’, अशी माहिती हवामान वेधशाळेच्या दिल्ली विभागाचे प्रमुख कुलदीप श्रीवास्तव यांनी दिली आहे.

- Advertisement -

सफदरजंगमध्येही उष्णतेचा भडका!

दरम्यान, शहरातील तापमानाची नोंद ठेवणाऱ्या सफदरजंग वेधशाळेमध्ये याचवेळी कमाल ४५.६ तर किमान २७.२ इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे. शहरातल्या उष्ण वाऱ्यांमुळे दिल्लीकरांचे चांगलेच हाल झाले आहेत. सामान्यपणे तापमान सलग २ दिवस ४५ अंशांपर्यंत पोहोचलं की त्याला हिट वेव्ह म्हणतात. मात्र आता दिल्लीने सगळे विक्रम मोडीत काढत ४८ अंशांवर तापमानाची नोंद केली आहे.

तापलेल्या मुंबईची शांती! सांताक्रूज परिसरात बरसल्या सरी! #MyMahanagar

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಸೋಮವಾರ, ಜೂನ್ 10, 2019

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -