घरताज्या घडामोडीWeather Update: दिल्ली, गुरुग्रामध्ये रेकॉर्ड ब्रेक उकाडा; काही भागात आज 'लू'चा इशारा

Weather Update: दिल्ली, गुरुग्रामध्ये रेकॉर्ड ब्रेक उकाडा; काही भागात आज ‘लू’चा इशारा

Subscribe

दिल्लीत उष्णतेच प्रमाण वाढवण्याचे सत्र कायम आहे. भारतीय हवामान विभागानुसार (IMD) दिल्लीत रविवारी किमान तापमानात वाढ नोंदवण्यात आली. किमान तापमान सामान्य चारपेक्षा अधिक 23.5 डिग्री सेल्सियस नोंद केले गेले. तर कमाल तापमान सामान्य 6 पेक्षा अधिक 41.6 डिग्री सेल्सियस नोंदवण्यात आले. येथील हवेतील आर्द्रतेची पातळी १५ ते ३२ टक्के होती. दिल्लीतील अनेक भागात आज ‘लू’चा इशारा हवामान विभागाने दिला आहे. यादरम्यान आभाळ स्वच्छ राहिल आणि तीव्र उन्ह लागले. तसेच कमाल तापमान 41 आणि किमान तापमान 22 डिग्री सेल्सियस राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

यापूर्वी शनिवारी दिल्लीत कमाल तापमान सामान्य 8 पेक्षा 42.4 डिग्री सेल्सियस नोंद केले गेले होते, जे गेल्या पाच वर्षातील एप्रिल महिन्यातील सर्वाधिक तापमान होते. हरयणाच्या गुरुग्रामध्ये कमाल तापमान सरासरीपेक्षा 10 डिग्रीहून जास्त 44.5 डिग्री सेल्सियस नोंद केले गेले. दिल्लीत 21 एप्रिल 2017ला कमाल तापमान 43.2 डिग्री सेल्सियस नोंद होऊन रेकॉर्ड केला होता. एप्रिल महिन्यात आतापर्यंत सर्वाधिक तापमान 29 एप्रिल 1941 रोजी 45.6 डिग्री सेल्सियस नोंद झाले होते. तसेच गुरुग्रामध्ये एप्रिल महिन्यातील आतापर्यंतचे सर्वाधिक तापमान 28 एप्रिल 1979 रोजी 44.8 डिग्री सेल्सियन नोंद केले होते.

- Advertisement -

मंगळवारपासून हवामानात बदल

हवामान विभागाच्या माहितीनुसार, दिल्लीत एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात इतके अधिक तापमान नोंद केली आहे, जे 72 वर्षात पहिल्यांदा घडले आहे. दरम्यान हवामान इशाऱ्यासाठी आयएमडीचे चार रंग कोड आहेत, हिरवा (कोणत्याही कारवाईची गरज नाही), पिवळा (धैर्य राखणे आणि महिती घेत राहणे), ऑरेंज (तयार राहणे) आणि लाल (कारवाई करणे) असे रंग इशारा देण्यासाठी वापरले जातात. आयएमडीने मंगळपासून दिल्लीतील ढगाळ वातावरणामुळे कडक उन्हापासून काहीसा दिलासा मिळण्याची अपेक्षा वर्तवली आहे. गेल्या आठवड्यापासून दिल्लीत उष्णतेची लाट सुरू आहे. कमाल तापमान 40 डिग्री सेल्सियस जवळच आहे.


हेही वाचा – Viral Video: इमरजन्सी लँडिंग करताना विमानाचे झाले दोन तुकडे!

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -