घरCORONA UPDATEकोरोनामुक्ती नंतर लसीसाठी ३ महिन्यांचे वेटिंग, केंद्राच्या नव्या गाईडलाईन्स जाहीर

कोरोनामुक्ती नंतर लसीसाठी ३ महिन्यांचे वेटिंग, केंद्राच्या नव्या गाईडलाईन्स जाहीर

Subscribe

स्तनपान करणाऱ्या महिलांनाही लस घेण्यास मंजुरी दिली आहे.

देशात कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी लसीकरण मोहिम वेगाने सुरु आहे. यातच स्तनपान करणाऱ्या महिला आणि कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांनी लस घ्यावी की नाही किंवा केव्हा घ्यावी यासंदर्भात संभ्रमाचे वातावरण होते. आरोग्य तज्ज्ञांनीकडूनही वेगवेगळे मत व्यक्त केले जात होते. यावर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज नव्या गाईडलाईन्स जाहीर केल्या आहेत. कोरोना संसर्गातून बरे झालेल्या व्यक्तींना ३ महिन्यांनंतर कोरोनाविरोधी लस घेता येणार आहे. तर स्तनपान करणाऱ्या मातांसाठीही लस सुरक्षित असल्याचे  केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.  कोरोनाविरोधी लसींवर काम करणाऱ्या राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार सामितीच्या नव्या शिफारसींच्या आधारे हा निर्णय घेण्यात आल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या प्रसिद्धी पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे की, ज्या व्यक्तींची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे अशा त्यांच्यावर मोनोक्लोनल अँटीबॉडी आणि प्लाझ्मा थेरपीद्वारे उपचार झाले आहेत असे रुग्ण तीन महिन्यानंतर लस घेऊ शकतात. तसेच लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर कोरोना संक्रमित झालेल्या रुग्णांनी लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी तीन महिन्यांपर्यंत पुढे ढकलला पाहिजे, असेही या केंद्राने नमूद केले. त्याचप्रमाणे कोरोना संसर्गातून बरे झाल्यानंतर डिस्चार्ज मिळाल्यानंतर लस घेण्यासाठी नागरिकांना ४ ते ८ आठवड्यांपर्यंत थांबावे लागेल, असे आरोग्य मंत्रालयाने सांगितले.

- Advertisement -

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने लसीकरणासंदर्भात जाहीर केलेल्या नव्या नियमावलीनुसार, स्तनपान करणाऱ्या महिलांनाही लस घेण्यास मंजुरी दिली आहे. राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार समितीने जेव्हा गर्भवती महिलांच्या लसीकरणाविषयी केंद्राशी चर्चा झाली त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनातून बरे होणाऱ्या नागरिकांच्या लसीकरणीसंदर्भात गेल्या आठवड्यात केंद्र सरकारने निर्णय जाहीर केल्यानंतर राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार समितीने अशा नागरिकांचे लसीकरण सहा महिन्यांपर्यंत स्थगित करण्याची शिफारस केली.

समितीच्या निर्णयानंतर केंद्र सरकारने कोव्हिशील्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर ६ ते ८ आठवड्यांवरून १२ ते १६ आठवड्यांपर्यंत वाढविले आहे. परंतु कोवॅक्सिन लसीच्या दोन डोसमधील अंतरात केंद्राने कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे कोवॅक्सिन लसीच्या दोन डोसमधील अंतर ४ ते ६ आठवड्यांपर्यंत असणार आहे.

- Advertisement -

दरम्यान कोव्हिशील्ड लसीचे उत्पादक सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे प्रमुख अदार पूनवाला यांनीही या निर्णयाचे स्वागत केले आहे. लसीची कार्यक्षमता आणि शरीरात रोगप्रतिकारशक्ती वाढण्याच्या दृष्टीकोनातून हा निर्णय फायदेशीर असल्याचे पूनावाला यांनी सांगितले. तसेच अमेरिकेतील प्रसिद्ध संसर्गजन्य रोगतज्ज्ञ डॉ. अॅथॉनी फॉकी यांनीही लसींचा तुटवडा सहन कारावा लागत असल्याने हा निर्णय वाजवी असल्याचे मत मांडले आहे.

दरम्यान सरकाराने हा निर्णय लसीच्या कमतरतेशी जोडलेला नाही. परंतु अनेक राज्यांमध्ये लसीचा तुटवडा निर्माण झाल्याने लसीकरण मोहिम थंडावली आहे. यात १ मेपासून लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात प्रौढ नागरिकांना लसी दिली जाणार आहे. आत्तापर्यंत भारतात कोरोनाविरोधी लसीचे १८.६३ कोटी डोस नागरिकांना देण्यात आले आहे. तर जवळपास ४.१० कोटी नागरिकांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहे.


 

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -