घरदेश-विदेशस्वामी नित्यानंदच्या 'कैलासा'चे प्रतिनिधी थेट संयुक्त राष्ट्र सभेत; कुठे आणि कसा आहे...

स्वामी नित्यानंदच्या ‘कैलासा’चे प्रतिनिधी थेट संयुक्त राष्ट्र सभेत; कुठे आणि कसा आहे देश ?

Subscribe

नवी दिल्ली : तुम्ही व्हर्च्यूअल वर्ल्डबद्दल ऐकले असेल. असाच एक व्हर्च्यूअल देश समोर आला आहे. काही दिवसांपासून नित्यानंद स्वामी चर्चेत आहेत आणि पुन्हा एकदा संयुक्त राष्ट्रातील सभेमुळे चर्चेत आला आहे. नित्यानंद स्वामीवर बलात्काराचा आरोप असून तो २०१९ मध्ये भारतामधून पळून गेला आहे. पळून गेल्यानंतर त्याने एक जमीन विकत घेतली आणि ती जमीन आपला वेगळा देश ‘कैलासा’ या नावाने घोषित केला.

जगात संयुक्त राष्ट्राची एक सभा होते. या सभेत विजयप्रिया नित्यानंद या नावाच्या एक महिलेने आपला म्हणणे मांडले. वियजप्रिया नित्यानंद स्वत:ला ‘युनायटेड स्टेट्स ऑफ कैलासा’ या देशाचे प्रतिनिधीत्व करत असल्याचे तिने सांगितले. तिने दावा केला आहे की, ती युनायटेड नेशन्समधील कैलासाची युनायटेड स्टेट्सची कायमस्वरूपी राजदूत आहे.

- Advertisement -

‘युनायटेड स्टेट्स ऑफ कैलासा’ हिंदूंचा पहिला सार्वभौम देश आहे आणि त्यांची स्थापना नित्यानंद यांनी असल्याचा दावा विजयप्रिया नित्यानंद हिने संयुक्त राष्ट्र सभेत केला. विजयप्रिया हिने नित्यानंद याला हिंदूंचा सर्वोच्च गुरू असे वर्णन केले असून त्यांचा छळ होत असल्याचा दावा तिने केला आहे. याशिवाय तिने नित्यानंद आणि कैलासाच्या २० लाख हिंदू स्थलांतरीत लोकसंख्येचा छळ थांबवण्यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय उपाययोजना केल्या पाहिजेत.

‘कैलासा’ हा एक काल्पनिक देश असून त्याला नित्यानंद याने नाव दिले आहे. नित्यानंद याच्यावर भारत बलात्कराचा आरोप आहे. त्याने २०१९ मध्ये भारतातून पळून गेला होता. त्यामुळे त्याला फरार घोषित करण्यात आले आहे. नित्यानंद याने ‘कैलासा’बद्दल अनेक दावे केले आहेत. त्याने असे दावे केले आहेत की, ते ऐकून कोणालाही धक्का बसेल.

- Advertisement -

त्यांनी केलेल्या दाव्याबद्दल जाणून घेऊ…
पहिला दावा : माध्यमातील बातम्यांनुसार भारतातून पळून गेल्यानंतर नित्यानंदने दक्षिण अमेरिकेतील इक्वाडोरमध्ये एक जमीन खरेदी केली आणि त्याने त्या जमीनीला आपला देश ‘कैलासा’ म्हणून घोषित केले. भारतापासून या देशाचे अंतर सुमारे १७ हजार किलोमीटर आहे.
दुसरा दावा : ‘कैलासा’च्या वेबसाईटवर दावा आहे की, कैलासा चळवळ अमेरिकेत सुरू झाली. त्यांची स्थापना नित्यानंद याने केली होती. संयुक्त राष्ट्रांमध्ये विजयप्रिया नित्यानंद हिने दावा केला की, ‘कैलासा’ हा हिंदूंचा एकमेव आणि पहिला सार्वभौम देश आहे.
तिसरा दावा : कैलासाच्या वेबसाईटवर लोकसंख्येबाबत हिंदू धर्म मानणारे 200 कोटी लोक त्यांच्या देशाचे नागरिक आहेत, असा दावा करण्यात आला आहे. त्यापैकी एक कोटी आदि शिवांना मानणारे आहेत. तसेच विजयप्रिया नित्यानंद हिने संयुक्त राष्ट्रात दावा केला की कैलासामध्ये 20 लाख स्थलांतरित हिंदू राहतात.
चौथा दावा : अलीकडेच 13 जानेवारी, 2023 रोजी कैलासाने अमेरिकेसोबत द्विपक्षीय करार झाल्याचा, तसेच अमेरिकेने कैलासाला मान्यता दिल्याचा दावाही केला जात आहे. कैलासाने 150 देशांमध्ये दूतावास आणि एनजीओ स्थापन केल्याचा दावा विजयप्रिया नित्यानंद हिने केला आहे.
पाचवा दावा : कैलास देखील स्वतःचे संविधान असल्याचा दावा करतो. याठिकाणी धर्मग्रंथ आणि मनुस्मृतीवर आधारित कायदा चालतो. येथील लोक मनूचे नियम पाळतात. कैलासाचे सरकार हे सर्वात महत्वाचे आणि अधिकृत धर्मशास्त्र (हिंदू कायद्याचे पुस्तक) मानते. ‘कैलासा’च्या वेबसाईटनुसार, प्राचीन भारतात या पुस्तकाच्या माध्यमातून केवळ दीड हजार वर्षांपूर्वी नियमांचे पालन केले जात होते.
सहावा दावा : ‘कैलासा’च्या वेबसाईटच्या दाव्यानुसार या देशात अत्याचारित हिंदूंना संरक्षण दिले जाते. येथे राहणारे हिंदू जात, लिंग असा कोणताही भेद न करता शांततेने राहतात.
सातवा दावा : वेबसाइटवरील उपलब्ध माहितीनुसार, कैलासमध्ये इंग्रजी, संस्कृत आणि तमिळ भाषा बोलल्या जातात. कैलासा देशाचा राष्ट्रीय प्राणी ‘नंदी’ आहे. देशाचे राष्ट्रीय फूल ‘कमळ’ आणि राष्ट्रीय वृक्ष ‘वट’ आहे.
आठवा दावा : कैलासाने स्वतःची रिझर्व्ह बँक असल्याचा दावा करत रिझर्व्ह बँक आणि चलन ऑगस्ट 2020 मध्ये सुरूवात झाल्याचे सांगितले.
नववा दावा : कैलासाचे स्वतःचे हिंदू विद्यापीठ आणि गुरुकुल देखील असल्याचा दावा वेबसाईटवर करण्यात आला आहे. विद्यापीठात सुमारे 6 हजार अभ्यासक्रम शिकविले जात असल्याचा दावाही केला जातो.
दहावा दावा : कैलासाचा राष्ट्रध्वज ‘ऋषभ ध्वज’ असून ध्वजावर नित्यानंदांचे चित्र आहे. एवढेच नाही तर त्यांचे स्वतःचे राष्ट्रगीतही आहे. कैलासाच्या वेबसाइटवर राष्ट्रगीत हिंदी, इंग्रजी आणि तमिळ भाषांमध्ये उपलब्ध आहे.

कोण आहे नित्यानंद
– नित्यानंद यांचा जन्म 1 जानेवारी 1978 रोजी तामिळनाडूमध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव अरुणाचलम आणि आईचे नाव लोकनायकी आहे.
– नित्यानंद यांनी 1992 मध्ये शालेय शिक्षण आणि 1995 मध्ये मेकॅनिकल इंजिनीअरिंग पूर्ण केले. वयाच्या 12 व्या वर्षापासून त्यांनी रामकृष्ण मठात शिक्षण घेण्यास सुरुवात केल्याचा दावाही केला जातो.
– 1 जानेवारी 2003 रोजी नित्यानंद यांनी बंगळुरूजवळील बिदादी येथे पहिला आश्रम उघडला आणि त्यानंतर अनेक आश्रम उघडण्यात आले.
– 2010 मध्ये नित्यानंदवर फसवणूक आणि अश्लीलतेचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्याची एक सेक्स सीडी समोर आली होती. या प्रकरणात नित्यानंदला अटकही झाली, मात्र काही दिवसांतच त्याला जामीन मिळाला.
– 2012 मध्ये नित्यानंद यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर नोव्हेंबर 2019 मध्ये पुन्हा त्याच्यावर दोन मुलींचे अपहरण करून त्यांना बंदिस्त ठेवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -