घरदेश-विदेशकोरोनाने गमावलेल्या पत्नीचा मृतदेह घरात ३ दिवस पडून, कोरोनाबाधित निवृत्त न्यायाधीशाने पत्रातून...

कोरोनाने गमावलेल्या पत्नीचा मृतदेह घरात ३ दिवस पडून, कोरोनाबाधित निवृत्त न्यायाधीशाने पत्रातून मांडली हतबलता

Subscribe

उत्तरप्रदेशची राजधानी लखनौमध्ये सध्या कोरोनाचा कहर सुरू आहे. सर्वसामान्यांपासून बडे नेते मंडळीदेखील या कोरोनाच्या विळख्यात सापडल्याचे दिसताय. दिवसेंदिवस वाढणाऱ्या बाधितांच्या संख्येने आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. असात एक प्रकार नुकताच समोर आला आहे. सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश आणि त्यांची पत्नी यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

कोरोना झाल्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून दोघं पती-पत्नी रुग्णालय तसेच सरकारला मदत मागत होते, मात्र ना रूग्णवाहिका आली न रुग्णालयात बेड मिळाला. तिसऱ्या दिवशी त्यांच्या पत्नीनं जीव सोडला. तीन दिवसांनंतर सेवानिवृत्त न्यायाधीशांची पत्नीसाठी सुरू असलेली धडपड अखेर संपली. दरम्यान, सेवानिवृत्त न्यायाधीश रमेश चंद्रा यांनी लिहिलेलं एक पत्र (चिठ्ठी) सध्या व्हायरल होत आहे. सेवानिवृत्त न्यायाधीश स्वत: कोरोना पॅाझिटिव्ह आहेत. त्यांनी चिठ्ठी लिहून हे भयाण वास्तव मांडल्यानंतर खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

असा घडला प्रकार

लखनौ येथील गोमती नगरातील विनम्र विभागात राहणारे सेवानिवृत्त न्यायाधीश रमेश चंद्रा हे ६७ तर त्यांची पत्नी मधु ६४ वर्षांची आहेत. दोघांनाही कोरोनाचा संसर्ग झाला. सरकारने जारी केलेल्या क्रमांकावर रुग्णवाहिका बोलवण्यासाठी त्यांनी संपर्क केला. जेणेकरून त्यांना रूग्णालयात दाखल होता येईल. परंतु प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. रुग्णालयाकडून एकच उत्तर होते की ते पाच मिनिटांत पोहोचत आहेत. मात्र तीन दिवस कोणीही आले नाही अखेर रमेश चंद्रा यांची पत्नी मधु यांचे निधन झाले.

- Advertisement -

सेवानिवृत्त न्यायाधीश रमेश चंद्रा यांच्या पत्नीचे निधन झाल्यानंतर देखील रुग्णालयातून कोणीही मृतदेह घेण्यास पोहोचले नाही. रुग्णालयाकडून त्यांना फक्त आश्वासनं दिलं गेलं मात्र मदतीसाठी कोणीही धावून आलं नाही. या धक्कादायक प्रकारानंतर त्यांनी सोशल मीडियावर एक पत्र पोस्ट केले, त्यानंतर ही हतबलता सर्वांसमोर आली.


भयंकर! कोरोनानं गेला पतीचा जीव; दोघी मुलींना घरी ठेवून धाकट्या पत्नीची तलावात उडी…

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -