घरमहाराष्ट्रभयंकर! कोरोनानं गेला पतीचा जीव; दोघी मुलींना घरी ठेवून धाकट्या लेकासह पत्नीची...

भयंकर! कोरोनानं गेला पतीचा जीव; दोघी मुलींना घरी ठेवून धाकट्या लेकासह पत्नीची तलावात उडी

Subscribe

राज्यात कोरोनाचा कहर सुरू असून दिवसेंदिवस कोरोनाने कित्येकांचा जीव जात आहे. कोरोनाची भिती मनात ठेऊन साधे लक्षणं जरी दिसू लागले तरी काही नागरिकांनी आपले प्राण संपवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस येत आहे. मात्र नांदेड जिल्ह्यातील लोहा शहरातून एक भयंकर प्रकार समोर आला आहे. एका महिलेच्या पतीचा कोरोनाने मृत्यू झाला आणि हा धक्का सहन न झाल्याने पत्नीने आपल्या मुलासह स्वतःचा जीव दिला आहे. या घटनेने नांदेडमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी या महिलेच्या पतीला कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्याच्यावर कोरोनाचे उपचार सुरू होते मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. यानंतर या महिलेने आपल्या दोन मुलींना घरात बंद करून लहान मुलाला सोबत घेत आपलं आयुष्य संपवलं.

असा घडला प्रकार

मिळालेल्या माहितीनुसार, गंदम कुटुंब हे तेलंगणातून नांदेड येथे मजुरी करण्यासाठी आले होते. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावादरम्यान वयवर्ष ४० असणाऱ्या शंकर गंदम यांना कोरोना झाला. लोहा येथील कोव्हिड रुग्णालयात मंगळवारी उपचारादरम्यान शंकर यांचा मृत्यू झाला. पतीच्या निधनानंतर आपले आयुष्य कसं जाईल या विचाराने तिने आपले आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला.

- Advertisement -

दोघी मुलींना घरी ठेवून आपल्या तीन वर्षांच्या मुलाला घेऊन तलावात उडी घेतली. या घटनेची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली. बुधवारी पहाटे मायलेकाने आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून लोहा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -