घरमहाराष्ट्रकुंभमेळ्याहून परतणाऱ्या भाविकांना कोरोना चाचणी बंधनकारक, वर्धा जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

कुंभमेळ्याहून परतणाऱ्या भाविकांना कोरोना चाचणी बंधनकारक, वर्धा जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

Subscribe

उत्तराखंडातील हरिद्वार येथे झालेल्या कुंभमेळ्यात हजारो भाविकांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे वर्धा जिल्ह्यातून गेलेल्या काही भाविकांनी वर्धा जिह्यात प्रवेश करण्याआधी कोरोना चाचणी करणे बंधनकारक आहे असे आवाहन जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी केले आहे. वर्धा जिल्ह्यात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने वर्ध्य़ात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कुंभमेळ्यातून येणाऱ्या भाविकांनी जिल्ह्यात परत आल्यावर स्वत: कोविड सेंटरमध्ये जात कोरोना चाचणी, तपासणी करुन घ्यावी असेही आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

तसेच संबंधित व्यक्तीने होम क्वारंटाइन होऊन कोरोना संबंधित नियमांचे पालन करावे. कुंभमेळ्यावरून परणारी व्यक्ती होम क्वारंटाइन न होत असल्यास त्याबाबतची माहिती वर्धा पोलीस नियंत्रण कक्षाला १०० या क्रमांकावरून द्यावी असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

हरिद्वार येथील कुंभमेळ्याच्या दुसऱ्या शाही स्नानाचे औचित्य साधत लाखो भाविक साधू संत यांनी कोरोना नियम पायदळी तुडवत गंगा नदीत स्नान केले. या कुंभमेळ्यात देशभरातील विविध राज्यातील ४८.५१ लाख जणांनी सहभाग घेतला होता. देशात कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर अनेका राज्यांमध्ये कडक निर्बंध लागू करण्यात आले मात्र याठिकाणी कोरोनाचे सर्व निर्बंध धाब्यावर बसवत शाही स्नानाचा कार्यक्रमा पार पडला. यावेळी पाच दिवसात २ लाख ३६ हजार ७५१ नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली त्यापैकी ४ हजाराहून अधिक जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेत. त्यामुळे परतीच्या प्रवासाला निघालेले भाविक आपआपल्या राज्यातही कोरोना संसर्ग वाढणार अशी भीती व्यक्त केली जात आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -