रॉयटर्सच्या दोन पत्रकारांना ७ वर्षांची शिक्षा

म्यानमारच्या रखाईन जिल्हयामध्ये १० रोहिंग्या मुसलमान माणसांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्येमागील कारण आणि हत्येमागे कोणाचा हात हे शोधण्याचे काम हे दोन पत्रकार करत होते.

Reuters 2 reporters sentence 7 years jail under state secrets act
रॉयटर्सच्या के वा लोन (३२), आणि क्याव सोए ओ यांगोन (२८) कोर्टात जाताना (सौजन्य- Reuters)

रॉयटर्सच्या दोन पत्रकारांना रोहिंग्या संदर्भात रिपोर्टिंग करणाऱ्या दोन पत्रकारांना सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा झाली आहे. म्यानमारमधील गोपनीयतेच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे या दोन पत्रकारांना ७ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. म्यानमारचे रहिवासी आणि रॉयटर्सचे पत्रकार के वा लोन (३२), आणि क्याव सोए ओ यांगोन (२८) यांना या संदर्भात डिसेंबरपासून अटक करण्यात आली आहे. या अटकेमुळे पत्रकारांच्या स्वातंत्र्यावर गदा आणल्याचे म्हटले जात आहे. शिवाय ज्या कायद्यांतर्गत या दोघांना अटक झाली आहे तो ब्रिटीशकालीन असून कायद्यांतर्गत १४ वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे.

रोहिंग्यांच्या खूनाचा करत होते तपास

म्यानमारच्या रखाईन जिल्हयामध्ये १० रोहिंग्या मुसलमान माणसांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्येमागील कारण आणि हत्येमागे कोणाचा हात हे शोधण्याचे काम हे दोन पत्रकार करत होते. या काळात त्यांना पोलिसांनी जेवणाचे निमंत्रण दिले आणि त्यांच्या हातात काही कागदपत्रे दिली. ते जसे त्या हॉटेलातून बाहेर पडले आणि त्यांना पोलिसांनी अटक केली. डिसेंबरला त्यांना गोपनीयतेच्या नियमांचे उल्लघंन केल्याप्रकरणी प्रत्येक ७-७ वर्षांची शिक्षा दोघांना सुनावण्यात आली.

Reuters journalist Wa Lone
रॉयटर्सचा पत्रकार के वा लोन प्रसारमाध्यमांशी बोलताना (सौजन्य- Reuters)

दोघांच्या सुटकेची मागणी

शिक्षेची सुनावणी झाल्यानंतर ही पत्रकारांची गळचेपी असल्याचे सांगत संयुक्त राष्ट्राने या दोन पत्रकारांच्या सुटकेची मागणी केली आहे. शिवाय शनिवारी १०० पत्रकारांनी अटकेतील पत्रकारांच्या समर्थनार्थ मोर्चादेखीक काढला. पण कोर्टात न्यायाधीश ये ल्वीनने मात्र कोणत्याही मागणीशी सहमत नसल्याचे सांगत म्यानमारच्या गोपनीयतेचे नियम मोडल्यामुळे त्यांना शिक्षा देण्यात आल्याचे कोर्टाकडून सांगण्यात आले.

रोहिंग्यांवर अत्याचार

रोहिंग्याच्या प्रश्नांकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. गेल्यावर्षी रखाइन राज्यांमध्ये सुरक्षादलांनी अल्पसंख्याक रोहिंग्या मुस्लिमांना मारले होते. म्यानमार सुरक्षादलाकडून त्यांच्यावर अनन्वित अत्याचार करण्यात आले. या महिलांवर बलात्कारासारखे अत्याचार करण्यात आले तर अनेकांची हत्या करण्यात आली. हे सगळे प्रकाशझोतात आणण्यासाठी हे पत्रकार काम करत होते.