घरदेश-विदेशसरकारी रूग्णवाहिकेत Romance; आक्षेपार्ह व्हिडिओ होतोय व्हायरल!

सरकारी रूग्णवाहिकेत Romance; आक्षेपार्ह व्हिडिओ होतोय व्हायरल!

Subscribe

सरकारी रुग्णवाहिकेतील १७ सेकंदाचा विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच होतोय व्हायरल

सरकारी रुग्णवाहिकेतील १७ सेकंदाचा एक विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा विचित्र प्रकार उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यातील असून व्हिडिओ व्हायरल होताच रुग्णवाहिका कंपनीने कर्मचाऱ्याला नोकरीवरून काढून टाकले असल्याचे सांगितले जात आहे.

आजतकने दिलेल्या माहितीनुसार, रामपूरच्या जिल्हा रूग्णालयात वापरली जाणारी रुग्णवाहिका जीव्हीके कंपनी चालवते. या कंपनीतील एका कर्मचाऱ्याचा आक्षेपार्ह व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये सरकारी रुग्णवाहिकेत एका महिलेसह कर्मचारी दिसत आहे. हा आक्षेपार्ह  व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाला याची माहिती मिळाली, तेव्हा त्यांनी तातडीने संबंधित जीव्हीके कंपनीला या विचित्र प्रकाराबद्दल कळवले.

- Advertisement -

मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मते, कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची संपूर्ण जबाबदारी कंपनीवर असते. हे प्रकरण समोर आल्यानंतर त्या कर्मचाऱ्यावर कायदेशीर कारवाई किंवा विभागीय कारवाई कंपनीने करायला हवी, असे सांगितले जात आहे.

रुग्णवाहिकेत काही आक्षेपार्ह कृत्य करताना व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर कंपनीच्या संबंधित व्यक्तीला यासंदर्भात जाब विचारण्यात आले. रुग्णवाहिका ऑपरेट करणार्‍या जीव्हीके कंपनीला याबद्दल सांगितल्यानंतर रविवारी स्थानिक व्यवस्थापक आणि प्रभारी यांनी त्या आरोपी कर्मचाऱ्याला कामावरून काढून टाकले आहे, असे मुख्य वैद्यकीय अधिकारी सुबोध कुमार शर्मा यांनी सांगितले आहे.


कोणताही संभ्रम नाही, कोरोना हवेतून पसरू शकतो; CSIRनं केलं मान्य!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -