घरश्रावण स्पेशलमहादेवाला प्रिय असणाऱ्या बेलपत्राचे आरोग्यदायी फायदे

महादेवाला प्रिय असणाऱ्या बेलपत्राचे आरोग्यदायी फायदे

Subscribe

शंकराला प्रिय असणारे बेल पत्र आपल्या आरोग्याकरता देखील फार महत्त्वाचे आहे. कारण बेलपत्रात एक नाही तर अनेक गुणकारी घटक आहेत. तसेच आयुर्वेदामध्ये बेलफळाला दशमान पैकी एक मानले जाते. बेलपत्र सेवन केल्याने शरीरात पोषण मूल्यांचे ग्रहण अतिशय चांगले होते. त्यामुळे मन एकाग्रह होऊन लक्ष केंद्रित होण्यास मदत होते.

  • बेलपत्राचा रस रक्तातील साखरेचे प्रमाण आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत करतो.
  • रिकाम्या पोटी किमान चार-पाच स्वच्छ धुतलेली आणि जाती बेलपत्र चघळून खाल्ल्याने रक्ताचील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते.
  • एक चमचा बेलपत्राच्या रसामध्ये मिरपूड आणि काळे मीठ टाकून घेतल्याने अपचनाचा त्रास कमी होतो.
  • किडा-मुंगी अथवा काही चावल्यानंतर त्यावर बेलाच्या पांनाचा रस लावल्याने जळजळ कमी होते.
  • बेलपत्र, कोथिंबीर आणि बडीशेपची चटणी बनवून खाल्ल्याने शरीराची गरमी दूर होते. तसेच तोंड येण्याची समस्या दूर होते.
  • बेलपात्राच्या एक चमचा रसामध्ये ओवा टाकून प्यायल्याने पोटातील जंताच्या समस्येमध्ये फायदा होतो.
  • एक चमचा बेलपत्राच्या रसामध्ये एक चमचा मध मिसळून घेतल्याने सर्दी, खोकला आणि व्हायरल फिव्हरमध्ये आराम मिळतो.

(टीप: वरील सल्ले डॉक्टरांच्या सल्ला घेऊन करावे)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -