घरताज्या घडामोडीरशियाच्या कोरोना लसीचं सत्य उघड

रशियाच्या कोरोना लसीचं सत्य उघड

Subscribe

मंगळवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी जगातील कोरोना पहिली लस विकसित झाल्याचा दावा केला. एवढेच नाही तर त्यांनी ही लस त्यांच्या मुलीलाही देण्यात आल्याचे पुतिन म्हणाले होते. पण या रशियाच्या लसीबाबत सत्य बाब समोर आली आहे. या कोरोना लसीची फक्त ३८ लोकांवर चाचणी केली आहे. यानंतर या रशियन लसीला मंजूरी देण्यात आली आहे, असा खुलासा रशियाच्या अधिकृत दस्तऐवजांचा हवाला देत डेली मेल रिपोर्टमध्ये केला आहे.

फोंटंका (Fontanka) न्यूज एजन्सीनुसार, रशियाच्या कोरोना लसीचे साइड इफेक्ट्स झाले आहेत. वेदना होणे, सूज येणे, जास्त ताप येणे, असे साइड इफेक्ट्स झाले आहे. त्याचबरोबर कमकुवतपणा येणे, एनर्जी कमी होणे, भूक न लागणे, डोकेदुखी होणे, अतिसार, नाक बंद होणे, घसा खराब होणे आणि नाक वाहणे असे साइड इफेक्ट्सची नोंद केली आहे.

- Advertisement -

तसेस रशियाच्या अधिकाऱ्यांना फक्त ४२ दिवस रिसर्चनंतर लसीला मान्यता दिली आहे. त्यामुळे ही लस किती प्रभाव आहे हे कळू शकले नाही, असा दावा या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. रशियाने आपल्या कोरोना लसीचे नाव Sputnik V असे ठेवले आणि अनेक देशांमध्ये उपलब्ध करून देण्यासाठी आणखी तयार देखील करत आहे. जगभरातील अनेक शास्त्रज्ञांनी रशियाच्या या निर्णयावर जोरदार टीका केली आहे. शास्त्रज्ञांनी ही भीती वाटत आहे की, ही लस चुकीची किंवा धोकादायक असल्याचे सिद्ध झाल्यास महामारी एक भयानक रुप धारण करू शकते.

पुतिन म्हणाले होते की, ‘मुलीला लस दिल्यानंतर काही काळासाठी ताप आला होता.’ पण लसीचे साइड इफेक्ट्स अनेक आहेत. हे साइड इफेक्ट्स व्यक्तीच्या शरीरात पुन्हा होऊ शकतात आणि बऱ्याच काळासाठी राहतात. या लसीचे साइड इफेक्ट्स जास्तीत जास्त स्वतः बरे झाले आहेत. परंतु ४२ व्या दिवशी साइड इफेक्ट्सच्या ३१ घटना झाल्या आहेत. लस दिल्यानंतर ४२ व्या दिवशी व्हॅटिलेंटवर असलेल्या शरिरात अँटीबॉडीजचे प्रमाण कमी होत होते, असा या रिपोर्टमधून सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

दरम्यान रशियाने १८ वर्षांच्या कमी वयाच्या आणि ६० वर्षांच्या जास्त वयाच्या लोकांना लस देण्यासाठी परवानगी दिली नाही आहे. कारण अशा लोकांवर काय परिणाम होईल याची माहिती नाही आहे.


हेही वाचा –  खुशखबर! सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या आजचे दर


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -