घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटCoronavirus: रशियातही वाढतोय कोरोनाचा धोका; राष्ट्राध्यक्ष पुतीन लष्कराची मदत घेणार

Coronavirus: रशियातही वाढतोय कोरोनाचा धोका; राष्ट्राध्यक्ष पुतीन लष्कराची मदत घेणार

Subscribe

जगभरात वेगाने पसरत असलेला कोरोना विषाणू आता रशियातही हळू हळू पसरू लागला आहे. कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी आा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी लष्काराला पाचारण करणार असल्याचे सांगितले आहे. सोमवारी रशियामध्ये नव्याने २,५५८ रुग्णांची नोंद करण्यात आली. तर रशियामध्ये आतापर्यंत एकूण १८,३२८ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे.

रशियामध्ये मागच्या २४ तासांत १८ लोकांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत १४८ रुग्ण दगावलेली आहेत. मात्र इटली, स्पेन, फ्रान्स आणि अमेरिका या देशाशी तुलना केल्यास हा आकडा सध्यातरी कमी वाटत आहे. ज्याप्रमाणे चीनमध्ये वुहान आणि अमेरिकेत न्यूयॉर्कला कोरोनाची सर्वाधिक झळ बसली. त्याप्रमाणे रशियात मॉस्कोला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेला आहे. त्यामुळेच मॉस्को आणि इतर काही ठिकाणी लॉकडाऊन घोषित करण्यात आलेला आहे.

- Advertisement -

काल व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे पुतिन यांनी आपल्या महत्त्वाच्या अधिकाऱ्यांसोबत संवाद साधला. “हा कठिण काळ लवकरच निघून जाईल. मात्र आपल्याला अविचारीपणे वागून चालणार नाही. रशियातील काही भागांमध्ये लॉकडाऊनचे गांभीर्य पाळले जात नाही. सध्या आपल्यासमोर अनेक संकटे आहेत. याकाळात बढाया मारणे आणि निश्चिंत राहणे आपल्याला परवडण्यासारखे नाही.”, असे आवाहन पुतिन यांनी केले.

पुतिन पुढे म्हणाले की, या संकटाचा सामना करण्यासाठी लष्कराची मदत घेतली जाईल. सरकार जी मदत लोकांपर्यंत पोहचू इच्छिते ती मदत लष्करामार्फत दिली जाईल. विशेषतः मॉस्कोसाठी आता एक संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. सोमवारपासून ही वेबसाईट लोकांना वापरासाठी खुली करण्यात येणार आहे. ज्या लोकांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्था किंवा स्वतःच्या गाडीने बाहेर जायचे आहे, त्यांनी आधी वेबसाईटवरून परवानगी घेणे गरजेचे राहणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -