घरदेश-विदेशयुद्धाचे ढग! रशियन सैन्य युक्रेनमध्ये घुसले; आता अमेरिका, पाश्चात्य देशांची भूमिका काय?

युद्धाचे ढग! रशियन सैन्य युक्रेनमध्ये घुसले; आता अमेरिका, पाश्चात्य देशांची भूमिका काय?

Subscribe

याआधी पुतिन यांनी युक्रेनच्या डोनेस्तक आणि लुहान्स्क प्रदेशांना स्वतंत्र देशांचा दर्जा दिला होता. यामुळे युक्रेनच्या सीमेवर तैनात असलेल्या 1,90,000 रशियन सैन्याचा या भागात प्रवेश करण्याचा मार्ग मोकळा झालाय. दोन अधिकृत आदेशांमध्ये पुतिन यांनी संरक्षणमंत्र्यांना बंडखोर प्रदेशात "शांतता राखण्याचे काम सुरू" करण्याचे आदेश दिले.

मॉस्कोः Russia Ukraine Conflict: युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढलाय. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी रशियन सैन्याला पूर्व युक्रेनमधील “रशियन समर्थक फुटीरतावाद्यांच्या दोन भागात” घुसण्याचे आदेश दिलेत. रशिया पाश्चात्य देशांच्या इशारे आणि निर्बंधांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे. रशियाच्या या आदेशामुळे युक्रेनमध्ये भीषण युद्धाचे संकट अधिक गडद झालेय.

याआधी पुतिन यांनी युक्रेनच्या डोनेस्तक आणि लुहान्स्क प्रदेशांना स्वतंत्र देशांचा दर्जा दिला होता. यामुळे युक्रेनच्या सीमेवर तैनात असलेल्या 1,90,000 रशियन सैन्याचा या भागात प्रवेश करण्याचा मार्ग मोकळा झालाय. दोन अधिकृत आदेशांमध्ये पुतिन यांनी संरक्षणमंत्र्यांना बंडखोर प्रदेशात “शांतता राखण्याचे काम सुरू” करण्याचे आदेश दिले.

- Advertisement -

लुहान्स्क आणि डोनेस्तक प्रदेशांनी 2014 मध्ये स्वतःला युक्रेनपासून वेगळे घोषित केले. या भागात रशियन वंशाचे बंडखोर अधिक आहेत. रशियाने युक्रेनपासून वेगळा देश म्हणून या भागांना मान्यता दिल्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर निषेध होत असून, अमेरिका आणि युरोपीय संघाकडून रशियावर निर्बंधही लादले जाणार आहेत. ही बातमी जेव्हा रशियाकडून युक्रेनमध्ये रात्री उशिरा आली, तेव्हा पुन्हा एकदा युक्रेनियन लोकांचा रशियावरचा विश्वास उडाला, तसेच युक्रेनियनांनी त्यांच्या देशाच्या सीमांचे संरक्षण करणे सुरूच ठेवलेय.

यापूर्वी संयुक्त राष्ट्रातील अमेरिकेच्या राजदूत लिंडा थॉमस-ग्रीनफिल्ड यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा दावा खोडून काढला होता. ज्यात पुतिन यांनी म्हटले आहे की, ज्या सैनिकांना पूर्व युक्रेनमध्ये पाठवण्यात आले. आदेश दिले आहेत, ते सैनिक शांततेच्या बाजूचे असतील. रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, युक्रेनच्या संकटावरील सुरक्षा परिषदेच्या तातडीच्या बैठकीत अमेरिकेच्या दूताने सांगितले की, “ते वास्तव काय आहे ते आम्हाला माहीत आहे?” युक्रेनमधील दोन बंडखोर आणि फुटीरतावादी प्रदेशांना स्वतंत्र मान्यता देणे हे या भागात युद्ध भडकावण्याचे निमित्त असल्याचे अमेरिकेने म्हटले.

- Advertisement -

“रशियाच्या कारवाईचे परिणाम संपूर्ण युक्रेन, संपूर्ण युरोप आणि जगभरात भयानक असतील,” असे संयुक्त राष्ट्रातील अमेरिकेच्या राजदूत लिंडा थॉमस-ग्रीनफिल्ड यांनी 15 सदस्यीय परिषदेच्या तातडीच्या बैठकीत सांगितले. रशिया आणि पश्चिमेकडील तणावाच्या पार्श्वभूमीवर रशियाने युक्रेनच्या सीमेजवळ 1,50,000 सैन्य तैनात केले आहे. मात्र, रशियाने युक्रेनवर आक्रमण करण्याचा आपला इरादा असल्याचा इन्कार केला असून, पाश्चात्य देशांवर उन्माद पसरवल्याचा आरोप केला आहे.


हेही वाचाः st Worker strike : एसटी विलीनीकरणाच्या मुद्द्यावर शुक्रवारी सुनावणी, सरकारी वकिलांनी मागितला वेळ

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -