घरताज्या घडामोडीRussia-Ukraine crisis : रशियाच्या १ लाख सैनिकांकडून हल्लाबोल, यूएनमध्ये सहकार्य करण्याची झेलेंस्की...

Russia-Ukraine crisis : रशियाच्या १ लाख सैनिकांकडून हल्लाबोल, यूएनमध्ये सहकार्य करण्याची झेलेंस्की यांची मोदींकडे मागणी

Subscribe

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर चर्चा केली. युद्धाच्या स्थितीत झेलेंस्की यांनी भारताला मदतीची मागणी केली आहे. एक लाखाहून अधिक रशियाच्या सैनिकांनी युक्रेनमध्ये घुसखोरी केल्याचे सांगितले आहे. संवादादरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना राजकीय पाठिंब्याचे आवाहन केले आहे. सुरक्षा परिषदेत त्यांना भारताचा पाठिंबा हवा आहे. तसेच रशिया कोणत्या भागात हल्ला करतंय याची माहिती झेलेंस्की यांनी मोदींना दिली आहे.

- Advertisement -

युक्रेनच्या राष्ट्रध्यक्षांनी पीएम मोदींशी केलेलं संभाषण खूप महत्त्वाचं समजलं जातंय. कारण काही दिवसांपूर्वीच युक्रेनने भारताच्या भूमिकेवर आक्षेप घेतला होता. तेव्हा भारताने तटस्थ भूमिका घेतली होती. परंतु युक्रेन मदतीची वाट पाहत होता. अशा स्थितीत दोन्ही बड्या नेत्यांची फोनवर चर्चा सुरू असताना मदतीपासून ते पाठिंब्यापर्यंत भर देण्यात आला आहे. राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की यांच्यासाठी भारताने त्यांना संयुक्त राष्ट्र परिषदेत पाठिंबा द्यावा, अशा प्रकारची मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे.

 रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्षाचा परिणाम आता भारतावर होत आहे. कारण रशिया हा भारताचा जुना मित्र आहे. दुसरीकडे पाहीलं असता युक्रेनकडूनही पाठिंब्याची अपेक्षा आहे. काही देशांनी उघडपणे युक्रेनला पाठिंबा दिला आहे. मात्र, भारताने अद्यापही ठोस भूमिका घेतलेली नाहीये. त्याचप्रमाणे अमेरिकेनेही भारत-रशियासोबतच्या संबंधांवर मोठे वक्तव्य केले आहे. भारत आणि रशिया हे दोन्ही देश संरक्षणाबाबत भागीदार असून त्यांचे संबंध चांगले आहेत. परंतु रशिया आणि अमेरिकेमध्ये तसे संबंध नाहीयेत, असं परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते नेड प्राइस यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा : up assembly election 2022 : यूपीमध्ये उद्या पाचव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडणार, १२ जिल्ह्यातील ६१ जागांवर होणार मतदान


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -