घरAssembly Battle 2022up assembly election 2022 : यूपीमध्ये उद्या पाचव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार...

up assembly election 2022 : यूपीमध्ये उद्या पाचव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडणार, १२ जिल्ह्यातील ६१ जागांवर होणार मतदान

Subscribe

उत्तर प्रदेशमध्ये उद्या रविवारी म्हणजेच २७ फेब्रुवारीला पाचव्या टप्प्यातील विधानसभा मतदारसंघात मतदाना होणार आहे. निवडणुकीचा प्रचार आता थांबवण्यात आला आहे. १२ जिल्ह्यातील ६१ जागांवर उद्या मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पक्षाच्या नेत्यांनी जोरदार सभा घेतल्या. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी चित्रकूट, प्रयागराज आणि सुलतानपूरमध्ये जाहीर सभा घेतल्या तसेच रोड शोही केला. त्याचवेळी सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी अयोध्येच्या बहराइचमध्ये सभा घेतल्या. यासोबतच काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी वड्रा यांनीही जाहीर सभा घेतल्या.

पाचव्या टप्प्यात राज्य सरकारच्या सहा मंत्र्यांसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य कौशांबीतील सिरथू येथून निवडणूक लढवत आहेत. त्यांचा सामना केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल यांची बहीण आणि अपना दल कामेरवाडीच्या पल्लवी पटेल यांच्या विरोधात होणार असून सपाच्या निवडणूक चिन्हावर त्या निवडणूक लढवत आहेत. अनुप्रियाची यांची आई कृष्णा पटेल प्रतापगड सदरमधून अपना दल कामेरवाडीतून निवडणूक लढवत आहेत. प्रतापगडमधून ग्रामीण विकास मंत्री राजेंद्र प्रताप सिंह उर्फ ​​मोती सिंह निवडणूक रिंगणात आहेत. खादी आणि ग्रामोद्योग मंत्री सिद्धार्थनाथ सिंह अलाहाबाद पश्चिममधून उमेदवार आहेत.

- Advertisement -

जेपी नड्डा यांचा विरोधकांवर निशाणा

संत कबीर नगर येथील एका सभेत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. पूर्वी उत्तर प्रदेश हे बिमारू राज्य म्हणून ओळखले जात होते. मात्र भाजपचे सरकार आल्यापासून येथे विकास होत असून राज्यात गुंतवणूक होत आहे. प्रत्येकाला येथे कारखाने उभारायचे आहेत, असं जेपी नड्डा म्हणाले.

- Advertisement -

भविष्यासाठी तुम्ही जबाबदारीने मतदान करा – प्रियांका गांधी-वाड्रा 

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी-वाड्रा यांनी महाराजगंज जिल्ह्यात एका सभेला संबोधित केलं. यावेळी त्या म्हणाल्या की, उत्तर प्रदेशच्या विकासासाठी आणि तुमच्या भविष्यासाठी तुम्ही जबाबदारीने मतदान करा. राज्य सरकारने गेल्या ५ वर्षात जनतेसाठी काम केलेले नाहीये. आश्वासने न पाळणाऱ्या राजकारण्यांना मतदान न करण्याची सवय लावली पाहिजे, असं प्रियांका गांधी म्हणाल्या.

रविवारी या जिह्यांत पार पडणार मतदान प्रक्रिया

राज्यातील १२ जिल्ह्यांमध्ये उद्या मतदान होणार असून यामध्ये अमेठी, रायबरेली, सुलतानपूर, चित्रकूट, प्रतापगड, कौशांबी, प्रयागराज, बाराबंकी, अयोध्या, बेनरिक, श्रावस्ती आणि गोंडा यांचा समावेश आहे.


हेही वाचा : Ranji Trophy: सॅल्यूट! मुलीच्या अंत्यसंस्कारानंतर रणजीमध्ये झळकावलं शानदार शतक, खेळाडूंसमोर ठेवला आदर्श


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -