घरताज्या घडामोडीरशियाच्या सुखोई-24 लढाऊ विमानाने आपल्याच शहरावर टाकला बॉम्ब; वाचा नेमकी घटना काय?

रशियाच्या सुखोई-24 लढाऊ विमानाने आपल्याच शहरावर टाकला बॉम्ब; वाचा नेमकी घटना काय?

Subscribe

रशिया आणि युक्रेनमध्ये भयंकर युद्ध आता पुतिनच्या सैन्याने चुकून त्यांच्याच शहराला लक्ष्य केले आहे. रशियाच्या सुखोई-24 लढाऊ विमानाने रशियाच्या युक्रेनला लागून असलेल्या बेल्गोरोड या शहरावर चुकून बॉम्ब टाकला. गुरूवारी रात्री हा बॉम्ब पडल्याने शहरातील रस्त्यावर 65 फूट मोठा खड्डा तयार झाला होता.

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाने आता पुतिनच्या सैन्याने चुकून त्यांच्याच शहराला लक्ष्य केले आहे. रशियाच्या सुखोई-24 लढाऊ विमानाने रशियाच्या युक्रेनला लागून असलेल्या बेल्गोरोड या शहरावर चुकून बॉम्ब टाकला. गुरूवारी रात्री हा बॉम्ब पडल्याने शहरातील रस्त्यावर 65 फूट मोठा खड्डा तयार झाला होता. या घटनेनंतर मोठा आवाज झाल्याने रशियन नागरिक घाबरले. या बॉम्बच्या पडझडीत आजूबाजूला उभ्या असलेल्या गाड्या उद्ध्वस्त झाल्या असून अनेक घरांचेही मोठे नुकसान झाले आहे. या बॉम्बस्फोटापूर्वीही मोठा आवाज ऐकू आल्याचे स्थानिकांनी सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, बेल्गोरोड शहर युक्रेनच्या सीमेपासून फक्त 40 किमी अंतरावर आहे. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, सुखोई एसयू-34 विमान बेल्गोरोड शहरावरून उड्डाण करत असताना चुकून त्याच्याच हद्दीत बॉम्ब पडला. रशियन पायलटने शेजारचे शहर असलेल्या खार्किव या युक्रेनियन शहरावर बॉम्ब टाकल्याचे समजते. खार्किव शहरात रात्रभर हवाई अलर्ट जारी करण्यात आला आहे. (russia ukraine war news in hindi putin war jet accidentally drops bomb on russian city belgorod)

- Advertisement -

या घटनेच्या पार्श्वभूमीवर बेल्गोरोड प्रदेशाचे गव्हर्नर यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोट झाला असून, या स्फोटात कोणत्याही नागरिकाचा मृत्यू झाला नाही. दोन नागरिक अंशत: जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्फोट इतका जोरदार होता की, एक कार शेजारच्या दुकानाच्या छतावर गेली. या स्फोटामुळे अनेक इमारतींच्या काचा फुटल्या असून मोटारींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. एवढेच नाही तर परिसरातील विद्युत खांबांचेही नुकसान झाले.

‘ज्या नागरिकांची घरे उद्ध्वस्त झाली आहेत, त्यांना जवळच्या हॉटेलमध्ये नेले जाऊ शकते’, असे रशियन गव्हर्नर म्हणाले. जानेवारीच्या सुरुवातीला त्यांनी सांगितले की, युद्धात आतापर्यंत या भागातील 25 लोक मारले गेले आहेत आणि 90 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. रशिया आपले सुखोई एसयू-34 अतिशय आधुनिक असल्याचे वर्णन करत आहे. या घटनेनंतर विमान आणि पायलटच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अलीकडेच रशियन राष्ट्राध्यक्षांनीही युक्रेनमधील रशियाच्या ताब्यातील शहराला भेट देऊन आपल्या सैनिकांना प्रोत्साहन दिले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – पंतप्रधान मोदींना जवानांचा कळवळा फक्त निवडणुकीच्या तोंडावरच येतो का? नाना पटोलेंचा सवाल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -