घरताज्या घडामोडीपंतप्रधान मोदींना जवानांचा कळवळा फक्त निवडणुकीच्या तोंडावरच येतो का? नाना पटोलेंचा सवाल

पंतप्रधान मोदींना जवानांचा कळवळा फक्त निवडणुकीच्या तोंडावरच येतो का? नाना पटोलेंचा सवाल

Subscribe

तोंडाच्या वाफेवर सरकार चालवणाऱ्या मोदींना जवानांबद्दलचा कळवळा फक्त निवडणुकीच्या तोंडावरच येतो का? असा सवाल उपस्थित काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. जम्मू-काश्मीरच्या राजौरी सेक्टरमधील पुंछ जिल्ह्यात दहशतवाद्यांनी लष्कराच्या ट्रकवर गोळीबार केला.

तोंडाच्या वाफेवर सरकार चालवणाऱ्या मोदींना जवानांबद्दलचा कळवळा फक्त निवडणुकीच्या तोंडावरच येतो का? असा सवाल उपस्थित काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. जम्मू-काश्मीरच्या राजौरी सेक्टरमधील पुंछ जिल्ह्यात दहशतवाद्यांनी लष्कराच्या ट्रकवर गोळीबार केला. गुरूवारी झालेल्या या हल्ल्यात ५ जवान शहीद झाले आहेत. तर एक जवान गंभीर जखमी झाला आहे. (Does PM Modi cares about soldiers only in the face of election question of nana patole)

जम्मू-काश्मीरच्या राजौरी सेक्टरमधील पुंछ जिल्ह्यात दहशतवाद्यांनी लष्कराच्या ट्रकवर केलेल्या गोळीबारानंतर काँग्रेसने भाजपावर हल्लाबोल केला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ट्विटरच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. “काल झालेल्या भारतीय लष्कराच्या वाहनावरील दहशतवादी हल्ल्यात ५ जवान शहीद झाले. या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सुद्धा मोदींना वेळ नाही”, असे नाना पटोले म्हणाले. शिवाय, तोंडाच्या वाफेवर सरकार चालवणाऱ्या मोदींना जवानांबद्दलचा कळवळा फक्त निवडणुकीच्या तोंडावरच येतो का? असा सवालीही नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे.

- Advertisement -

दरम्यान, दहशतवादी हल्ल्यानंतर नान पटोले यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला भाजपा कसे प्रत्युत्तर देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

नेमकी घटना काय?

- Advertisement -

जम्मू-काश्मीरच्या राजौरी सेक्टरमधील पुंछ जिल्ह्यात दहशतवाद्यांनी लष्कराच्या ट्रकवर गोळीबार केला. या हल्ल्यात ५ जवान शहीद झाले आहेत. तर एक जवान गंभीर जखमी झाला आहे. या हल्ल्यानंतर एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. त्यानुसार, भारतीय लष्कर आणि सुरक्षा यंत्रणांना राजौरीमधील पुंछ सेक्टरमध्ये एकाच क्षेत्राजवळ दोन गटांतील 6 ते 7 सक्रिय दहशतवादी असल्याची माहिती मिळाली आहे. हे दहशतवादी लष्कर-ए-तैयबा (एलईटी) आणि पाकिस्तानचे असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

या ठिकाणी अधिक तपास करण्यासाठी एनआयएचे पथकही शुक्रवारी दाखल झाले आहे. तसेच, ड्रोन आणि हेलिकॉप्टरच्या माध्यमातूनही शोध घेतला जात आहे. शिवाय, अनेक विशेष दलांची पथके या भागात पाठवण्यात आली आहेत.


हेही वाचा – पूंछमधील लष्करावरील हल्ल्यात 7 दहशतवादी असल्याचा संशय; एनआयएच्या पथकासह डीजीपी घटनास्थळी दाखल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -