घरताज्या घडामोडीRussia-Ukraine War: रशिया युक्रेन यु्द्धात अमेरिकेची थेट एन्ट्री, रशियाला घेरण्यासाठी पाठवले 12000...

Russia-Ukraine War: रशिया युक्रेन यु्द्धात अमेरिकेची थेट एन्ट्री, रशियाला घेरण्यासाठी पाठवले 12000 सैनिक

Subscribe

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धविरामासंदर्भातील चर्चा निष्फळ ठरल्या आहेत. यामुळे अमेरिकेसह इतर पाश्चिमात्य देशांनीही या युद्धात उड्या मारल्या आहेत. एकीकडे युक्रेनला रशियाविरुद्ध लढण्यासाठी हे देश शस्त्रपुरवठा करत आहेत. त्याच जोरावर युक्रेनने रशियाला रोखून धरले आहे.

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाला सतरा दिवस उलटले आहेत. पण युद्धबंदीची कुठलीच शक्यता दिसत नसल्याने आता अमेरिकेने या युद्धात थेट एन्ट्री घेतली आहे. रशियाला घेरण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी 12000 अमेरिकन सैनिकांची फौज युद्धभूमीत पाठवली आहे. यामुळे येत्या काही दिवसात हे युद्ध अधिक भयंकर स्वरूप घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धविरामासंदर्भातील चर्चा निष्फळ ठरल्या आहेत. यामुळे अमेरिकेसह इतर पाश्चिमात्य देशांनीही या युद्धात उड्या मारल्या आहेत. एकीकडे युक्रेनला रशियाविरुद्ध लढण्यासाठी हे देश शस्त्रपुरवठा करत आहेत. त्याच जोरावर युक्रेनने रशियाला रोखून धरले आहे. यामुळे युक्रेनमधील चार-पाच शहरांवरच रशियाला ताबा मिळवता आला आहे. यामुळे रशिया अधिक आक्रमक झाला असून, युक्रेनचा विध्वंस करण्यासाठी उतावीळ झाला आहे.

- Advertisement -

याच पार्श्वभूमीवर अमेरिकेनेही रशियाला घेरण्यासाठी 12 हजार सैनिकांची कुमक पाठवल्याचे बायडेन यांनी सांगितले आहे. तसेच नाटोचे सैनिक युक्रेनच्या प्रत्येक इंच इंच जमिनीचे संरक्षण करणार असून, पुतीन यांना युक्रेनवर विजय मिळवता येणार नाही, असा दावा बायडेन यांनी केला आहे. तसेच युक्रेनमध्ये तिसरे महायुद्ध लढण्याची इच्छा नाही, असेही बायडेन म्हणाले आहेत. बायडेन यांनी रशियाच्या सीमारेषेला लागून असलेल्या लातविया, एस्टोनिया, लिथुआनिया आणि रोमानिया येथे या फौजा पाठवल्या आहेत. त्याचबरोबर बायडेन यांनी रशियन सैनिकांबरोबर लढण्यासाठी मैदानात उतरलेल्या सामान्य युक्रेनियन नागरिक आणि सैनिकांच्या साहसाला अभिवादन केले आहे. या वाईट परिस्थितीत अमेरिका फक्त युक्रेनच नाही तर तमाम युरोपियन देशांच्या खांद्याला खांदा लावून युक्रेनचे संरक्षण करणार असल्याचा दावाही बायडेन यांनी केला आहे.

यावेळी बायडेन यांनी पुतीन यांना धमकीवजा इशारा देताना म्हणाले की, रशियावर सर्व बाजूंनी दबाव आणण्यासाठी आणि आंतरारष्ट्रीय मंचावर त्याला एकटे पाडण्यासाठी अमेरिका सक्षम आहे. रशियाला घेरण्यासाठी अमेरिकेचे पायलट, सैनिक आपल्या रणगाड्यांसह रवाना झाले असून, याला विनोद समजण्याची रशियाने चूक करू नये. तसेच यावेळी बायडेन यांनी G-7 मधील कॅनेडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, ब्रिटन या देशांनीही रशियावर निर्बंद्ध लावावे, असे सूचित केले.

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -