घरदेश-विदेशRussia Ukraine War : युक्रेनच्या राष्ट्रपतींना जीवे मारण्याचा प्रयत्न, रशियाने घरावर केला...

Russia Ukraine War : युक्रेनच्या राष्ट्रपतींना जीवे मारण्याचा प्रयत्न, रशियाने घरावर केला रॉकेट हल्ला

Subscribe

रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या 10 दिवसांपासून युद्ध सुरु आहे. रशिया सैन्याने युक्रेनची राजधानी कीवसह अनेक महत्वाची शहरं उद्ध्वस्त केली आहेत

रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या 10 दिवसांपासून युद्ध सुरु आहे. रशिया सैन्याने युक्रेनची राजधानी कीवसह अनेक महत्वाची शहरं उद्ध्वस्त केली आहेत. तसेच युक्रेनचे लष्करी तळ, अणु ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले चढवले आहेत. प्रचंड विध्वंस होऊनही दोन्ही देशांमधील युद्ध थांबताना दिसत नाही. अशातच रशियाकडून वारंवार युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांनी जीवे ठार मारण्याचा प्रयत्न सुरु आहेत. शनिवारी राष्ट्रपती झेलेन्स्की यांच्या घराजवळ रॉकेटचे काही भाग आढळून आले आहेत. त्यामुळे राष्ट्रपती निवास स्थानाला मिसाईल हल्ल्याने उडवून देण्याचा रशियाचा प्रयत्न असल्याचे म्हटले जातेय. मात्र या हल्ल्यात कोणतीही जीवितनाही झालेली नाही तसेच राष्ट्रपतींच्या निवासस्थानाचेही नुकसान न झाल्याचे वृत्त आहे.

राष्ट्रपती व्लादिमीर झेलेन्स्की यांनी स्वत: या मिसाईल हल्ल्याची माहिती दिली आहे. रशियाला राष्ट्रपती भवनावर हल्ला करायचा होता मात्र निशाणा चुकला. यापूर्वी देखील रशियाने मला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी म्हटले आहे. युद्ध सुरु झाल्यापासून रशियाने कट रचून तीन वेळा झेलेन्स्की यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र यातून ते सुखरूप वाचले अशी माहिती समोर येत आहे.

- Advertisement -

यापार्श्वभूमीवर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की सुरक्षेच्या कारणास्तव युक्रेन सोडून पळून गेल्याचा दावा रशियाकडून केला जातोय. युक्रेनियन राष्ट्राध्यक्षांनी युक्रेन सोडून पोलंडला आश्रय घेतल्याचे वृत्त रशियातील सरकारी वृत्तवाहिनी स्पुतनिकने केलाय. मात्र युक्रेनने हा दावा फेटाळला आहे. झेलेन्स्की यांनी युक्रेन सोडला नसून ते अद्याप आपल्या देशात असल्याचे युक्रेनकडून सांगितले जातेय.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -