घरCORONA UPDATEधक्कादायक! २०१२ मध्ये चीनच्या खाणीत आढळला होता कोरोनाचा विषाणू

धक्कादायक! २०१२ मध्ये चीनच्या खाणीत आढळला होता कोरोनाचा विषाणू

Subscribe

कोरोनाचा विषाणू चीनमधील वुहान येथील प्रयोगशाळेत बनवण्यात आल्याचा दावा करण्यात येत होता. तर काही दाव्यांनुसार वुहान येथील मांस बाजारातून हा विषाणू सर्वत्र फैलावला असल्याचे बोलले जात आहे. मात्र, एका नवीन दाव्यानुसार करोनाचा विषाणू २०१२ मध्ये चीनमधील एका खाणीत आढळला होता, असा आणखी एक दावा समोर येत आहे.

काही शास्त्रज्ञांनी केलेल्या दाव्यानुसार चीनमधील युन्नान प्रातांतील एका खाणीत २०१२ मध्ये सहा कामगारांना न्यूमोनिया सारखा आजार झाला होता. हे कामगार वटवाघळांनी केलेली घाण स्वच्छ करत होते. या सहापैकी तिघांचा मृत्यू झाला. या तिघांचा संबंध वुहान प्रयोगशाळेशी होता. ‘द सन’ने दिलेल्या वृत्तानुसार, या कामगारांवर उपचार करणारे फिजीशियन ली शू यांच्यानुसार, या कामगारांना ताप, कोरडा खोकला, हात-पाय दुखणे आणि काही प्रमाणात डोकेदुखी होती. ही सर्व लक्षणे सध्या कोविड-१९ बाधितांमध्ये आढळत आहेत. ही खाण वुहानच्या प्रयोगशाळेपासून १००० मैल दूर अंतरावर असल्याची माहिती देण्यात आली.

- Advertisement -

वायरॉलिजिस्ट जोनाथन लॅथम आणि मॉलिक्यूलर बायॉलॉजिस्ट ऐलिसन विल्सन हे बायोसायन्स रिसोर्स प्रोजेक्टसाठी काम करत होते. त्यांनी लू शी यांचे हे संशोधन वाचले आहे. त्यांनी सांगितले की, या संशोधनात जे पुरावे दाखवले आहेत, त्यानुसार या महासाथीच्या आजाराला नव्या पद्धतीने ते समजून घेत आहेत. जोनाथन यांनी दावा केला की, आजारी पडलेल्या खाण कामगारांचे नमुने वुहान येथील प्रयोग शाळेत पाठवण्यात आले होते.

हेही वाचा –

Maharashtra Assembly Session : पावसाळी अधिवेशन ७ सप्टेंबरपासून!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -