घरदेश-विदेशचिनी हॅकर्सकडून सीरम, बायोटेक या लस उत्पादक कंपन्याही लक्ष्य

चिनी हॅकर्सकडून सीरम, बायोटेक या लस उत्पादक कंपन्याही लक्ष्य

Subscribe

गोलमन सॅक्सशी संबंधित सायफार्मा या कंपनीच्या मते, चिनी हॅकिंग ग्रुप ‘एटीपी१०’ ने भारत बायोटेक आणि सीरम इन्स्टिट्यूटच्या आयटी इन्फ्रास्ट्रक्चरमधील त्रुटींचा फायदा घेत घुसखोरीचा प्रयत्न केला

जगभरात कोरोना प्रादुर्भाव केल्याच्या आरोपाचा सामना करणार्‍या चीनच्या कुरापती थांबलेल्या नाहीत. पूर्व लडाखमध्ये आक्रमक होत भारतीय सीमेत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणार्‍या चीनला भारताने सणसणीत उत्तर दिले. आता चीनच्या डोळ्यात भारतातील लस खुपत आहे. म्हणूनच चिनी हॅकर्सकडून भारतातील लस उत्पादक कंपन्यांना लक्ष्य करण्यात येत आहे. सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक या दोन कंपन्या भारतात कोरोनावरील लस तयार करत आहेत. या दोन्ही कंपन्यांना चिनी हॅकर्सनी अलिकडेच लक्ष्य केल्याचे समोर आले आहे.

भारतात कोरोना लस बनवणार्‍या दोन कंपन्यांना चिनी सरकारचा पाठिंबा असलेल्या हॅकर्सनी लक्ष्य केले आहे. गोलमन सॅक्सशी संबंधित सायफार्मा या कंपनीच्या मते, चिनी हॅकिंग ग्रुप ‘एटीपी१०’ ने भारत बायोटेक आणि सीरम इन्स्टिट्यूटच्या आयटी इन्फ्रास्ट्रक्चरमधील त्रुटींचा फायदा घेत घुसखोरीचा प्रयत्न केला, असे सायबर इंटेलिजेंस फर्म सायफर्माने म्हटल्याचे वृत्त रॉयटर्सने दिले आहे.

- Advertisement -

चिनी ‘एटीपी१०’ या हॅकिंग ग्रुपला स्टोन पांडा म्हणूनही ओळखले जाते. हॅकिंग ग्रुपने दोन्ही कंपन्यांच्या पुरवठा साखळीच्या सॉफ्टवेअरमध्येही घुसखोरी केली आहे. सायबर हल्ल्याचा मुख्य हेतू हा इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीला लक्ष्य करणं आणि स्पर्धेत भारतीय कंपन्यांवर आघाडी मिळविण्याचा होता, असे सायफार्माचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार रितेश यांनी सांगितले. रितेश यांनी ब्रिटिश गुप्तचर संस्थेमध्ये सायबर संबंधित वरिष्ठ अधिकारी पदावर काम केले आहे.

‘एटीपी१०’ हे सायबर हॅकर्स सीरम इन्स्टिट्यूटला लक्ष्य करत होते. सीरम इन्स्टिट्यूट अनेक देशांसाठी अ‍ॅस्ट्राझेनकाची लस बनवत आहे. सीरममध्ये लवकरच नोव्हाव्हॅक्सचेही मोठ्या प्रमाणात उत्पादन होणार आहे. हॅकर्सना या कंपनीचे अनेक सर्व्हर्स कमकुवत असल्याचे आढळून आले. हॅकर्सनी कमकुवत वेब अ‍ॅप्लिकेशन्स आणि कमकुवत सामग्री व्यवस्थापन यंत्रणेवरही बोलले आहेत आणि हे अत्यंत चिंताजनक आहे, असे रितेश म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -