घरदेश-विदेशसेक्स केल्याने होणार मलेरियाच्या डासांचा खात्मा

सेक्स केल्याने होणार मलेरियाच्या डासांचा खात्मा

Subscribe

मलेरियाच्या डासांना कायमचं संपवण्यासाठी विशेष प्रजातीच्या डासांची निर्मिती करण्यात येणार आहे. या डासांमध्ये संभोग झाल्यास ते दोघेही मरतात. यामुळे जीवघेण्या डासांची उत्पत्ती थांबू शकेल.

मलेरियाच्या डासांना कायमचं संपवण्यासाठी मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी खास प्लॅन बनवला आहे. या प्लॅननुसार नर आणि मादी डासांनी संभोग केल्यानंतर काही क्षणातच त्या दोघांचाही मृत्यू होईल. यासाठी खास पद्धतीच्या नर डासांची निर्मिती करण्यात येणार आहे. या प्रोजेक्टसाठी तब्बल २७ कोटी रूपये खर्च करण्यात येणार आहे. इंग्लंडमधील ऑक्सीटेक कंपनी विशेष प्रजातींच्या नर डासांची निर्मिती करणार आहे. याचे नाव ‘फ्रेन्डली डास’ ठेवण्यात येणार आहे. परदेशातील एका इंग्रजी वृत्तपत्रातील बातमीनुसार २०२० सालापर्यंत ‘फ्रेन्डली डास’ निर्मितीची प्रात्यक्षिकं तयार होतील.

बिल गेट्स यांच्या संस्थेला निधी देणार

Bill and Melinda Gates
बिल अँड मेलिंडा गेट्स

डासांना मारल्यास जीवघेणे आजार पसरतात. मात्र फ्रेन्डली डास यांची निर्मिती झाल्यानंतर मलेरियासारख्या आजारापासून सुटका होऊ शकते. बिल गेट्स यांच्या ‘बिल अँड मेलिंडा’ या सामाजिक संस्थेला यासाठी निधि उपलब्ध करून देण्यात आला आहे. या विशेष प्रजातीच्या डासांमध्ये असे काही घटक असतील जे मर्यादित वेळेत त्यांच्या संपर्कात येणाऱ्या डासाला संपवतील.

- Advertisement -

मुंबईतही ‘फ्रेन्डली डास’ हवा

mosquito
मलेरियाचा डास (प्रातिनिधिक चित्र)

मुंबईमध्ये पावसाळ्यात साथीचे रोग झपाट्याने फैलावतात. यंदा जानेवारी ते एप्रिल २०१८ या काळात राज्यभरात १ हजार ९०८ मलेरियाचे रुग्ण आढळले आहेत. मात्र एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. अद्याप पावसाळ्यातील आकडेवारी समोर आलेली नाही. गेल्या काही वर्षांत साथीच्या रोगांचे प्रमाण वाढले आहे. त्यात राज्यात गेल्या वर्षी म्हणजेच २०१७ साली १९ जणांचा बळी गेला. तर २०१६ आणि २०१५ साली अनुक्रमे २६, ५९ जणांचा मलेरियामुळे मृत्यू झाला. जी/दक्षिण विभागांत १००० मलेरियाच्या रुग्णांची नोंद करण्यात झाली असून एफ/दक्षिण आणि ई विभागात प्रत्येकी ५०० रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे भारतातही फ्रेन्डली डांसाची निर्मिती केल्यास येथील साथीच्या आजारांना आळा बसू शकतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -