घरदेश-विदेशशबरीमाला मंदिर परिसरात २२ डिसेंबरपर्यंत जमावबंदी

शबरीमाला मंदिर परिसरात २२ डिसेंबरपर्यंत जमावबंदी

Subscribe

महिलांप्रवेशाला विरोध करण्यासाठी आंदोलन देखील करण्यात आली आहेत. त्यामुळे शबरीमाला मंदिर परिसरामध्ये १४४ कलम (जमावबंदी) लागू करण्यात आले होते. यानुसार मंदिर परिसरामध्ये ४ पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास बंदी आहे.

पठाणमथिट्टा जिल्हा सत्र न्यायालयाने शबरीमाला मंदिर परिसरामध्ये लागू केलेली जमावबंदी २२ डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत कायम ठेवली आहे. पंबा आणि सनिदनमचे जिल्हा पोलीस प्रमुख आणि कार्यकारी दंडाधिकारी यांनी दिलेल्या अहवालावरुन हा निर्णय घेण्यात आला आहे. शबरीमाला मंदिरामध्ये १० ते ५० वयोगटातील महिलांना प्रवेश नाकारण्यात आला आहे. महिलांप्रवेशाला विरोध करण्यासाठी आंदोलन देखील करण्यात आली आहेत. त्यामुळे शबरीमाला मंदिर परिसरामध्ये १४४ कलम (जमावबंदी) लागू करण्यात आले होते. यानुसार मंदिर परिसरामध्ये ४ पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास बंदी आहे. हे जमावबंदीचे आदेश कोर्टाने कायम ठेवले आहेत.

३० महिलांनी मागितली प्रवेशाची परवानगी

केरळच्या प्रसिध्द शबरीमाला मंदिरामध्ये सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश देण्याचे सुप्रीम कोर्टाने आदेश दिले होते. तरी देखील मंदिरामध्ये सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. महिला प्रवेशाला विरोध करत आंदोलन केली जात आहे. दरम्यान, मंगळवारी ३० महिलांच्या गटाने केरळच्या मुख्यमंत्र्यांकडे येत्या २३ डिसेंबरला मंदिरामध्ये प्रवेश मिळावी यासाठी परवानगी मागितली आहे. या महिला १० ते ५० वयोगटातील आहेत. या महिला गटाच्या प्रतिनिधीने मुख्यमंत्री पी विजयन यांना पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये त्यांनी मंदिर प्रवेशाची परवानगी मिळावी आणि पोलीस सुरक्षा मिळावी अशी या पत्राच्या माध्यमातून विनंती केली आहे. तसंच या महिलांनी सांगितले की, त्यांची विनंती संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांना पाठवण्यात आली आहे

- Advertisement -

४ तृतीयपंथीयांनी घेतले दर्शन

चार तृतीयपंथीयांनी साडी नेसून मंदिरात प्रवेश करुन अयप्पाचे दर्शन घेतले. या सर्वांना पंबा येथून मंदिराच्या पायऱ्या चढण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस तैनात करण्यात आले होते. सकाळी ९.४५ वाजता या चार जणांनी मंदिरात प्रवेश करुन अयप्पाचे दर्शन घेतले. याआधी शबरीमाला मंदिर आणि मंदिराच्या आसपासच्या परिसर विरोधाचे स्थान बनले आहे. शबरीमाला मंदिरात १० ते ५० वयोगटातील महिलांना मंदिर प्रवेशाला विरोधत करत आंदोलन करण्यात आले होते. दरम्यान सुप्रीम कोर्टाने काही महिन्यापूर्वी शबरीमाला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश देण्याचे आदेश दिले होते. तरी देखील मंदिरात महिलांना प्रवेश दिला जात नाही.

हेही वाचा – 

- Advertisement -

शबरीमाला मंदिर प्रवेशापासून २ महिलांना रोखलं

शबरीमाला मंदिर परिसराला युध्दभूमी केले – के जे अल्फॉन्स

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -