घरदेश-विदेशशबरीमाला मंदिर परिसराला युध्दभूमी केले - के जे अल्फॉन्स

शबरीमाला मंदिर परिसराला युध्दभूमी केले – के जे अल्फॉन्स

Subscribe

शबरीमाला मंदिर परिसरामध्ये आणीबाणीपेक्षा खूप कठीण परिस्थिती असून केरळ सरकारने शबरीमाला मंदिर परिसर युध्दभूमी बनले असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री के जे अल्फॉन्स यांनी दिली आहे.

केरळचे प्रसिध्द शबरीमाला मंदिरामध्ये महिलांना प्रवेशाचा वाद काही संपेने. सर्व वयोगटातील महिलांना शबरीमाला मंदिरात प्रवेश देण्यात यावा असे आदेश देऊन सुध्दा महिलांना मंदिर प्रवेश करण्यास विरोध केला जात आहे. शबरीमाला मंदिर १६ नोव्हेंबरला दोन महिन्यासाठी खुले करण्यात आले. रविवारी रात्री मंदिर परिसरामध्ये लागू करण्यात आलेल्या नियमाचे पालन न केल्यामुळे ७२ भक्तांना पोलिसांनी अटक केली. या परिस्थिती पाहण्यासाठी केंद्रीय मंत्री के जे अल्फॉन्स शबरीमाला मंदिर परिसरामध्ये सोमवारी सकाळी पोहचले. त्यांनी सांगितले की, आणीबाणीपेक्षा खूप कठीण परिस्थिती याठिकाणी असून केरळ सरकारने शबरीमाला मंदिर परिसर युध्दभूमी बनले असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. भक्तांना पुढे जाऊन दिले जात नाही. कारण नसताना मंदिर परिसरामध्ये १४४ कलम लागू करण्यात आले आहे. भक्त दहशतवादी नाहीत मग सरकारला १५ हजार पोलीस कर्मचाऱ्यांची गरज कशासाठी आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

विरोध करुनही जागा सोडली नाही

रविवारी रात्री शबरीमाला मंदिर परिसरामध्ये तणाव तेव्हा निर्माण झाला. जेव्हा शबरीमाला मंदिर आणि त्याच्या आसपासच्या परिसरात बंदी असूनही २०० पेक्षा अधिक भक्तांनी जागा सोडले नाही आणि भजन बोलण्यास सुरुवात केली. पोलिसांनी विरोध करुन देखील त्यांनी भजन थांबवले नाही. त्यानंतर पोलिसांनी भजन करणाऱ्यांना अटक केली. पोलिसांनी रविवारी रात्री ६८ आंदोलनकर्त्यांना देखील अटक केली होती.

- Advertisement -

पोलिसांच्या कारवाईनंतर तणाव

आंदोलनकर्त्यांना अटक केल्यानंतर तणावपूर्व परिस्थिती निर्माण झाली. मुख्यमंत्री निवासस्थानी धरणे देण्यासाठी जाणाऱ्या भाजप कार्यकर्त्या आणि आरएसएसच्या स्वयंसेवकांना रस्त्यामध्येच रोखण्यात आले. काही पोलीस स्टेशन आणि आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर विरोध करण्यात आला. केरळ राज्याच्या तिरुवनंतपुरम, आलप्पुषा, एनार्कुलम, पत्तनमत्तिट्टा आणि कोझीकोड जिल्ह्यामध्ये आंदोलनकर्त्यांनी मध्यरात्री प्रार्थना सभेचे आयोजन केले.

आंदोलन तीव्र करण्याची शक्यता

आरएसएसने सोमवारी राज्यभर विरोध करण्याची घोषणा केली. शबरीमाला कर्म समिती, सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याची तयारी आहे. समितीने आरोप केला आहे की, सुप्रीम कोर्टने सर्व वयोगटातील महिलांना मंदिर प्रवेशाची परवानगी देऊन त्यांच्या प्रथा-परंपरांना नष्ट केले आहे. त्यामुळे केरळच्या शबरीमाला मंदिरामध्ये महिला प्रवेशाला विरोध करण्यासाठी तीव्र आंदोलन केले जात आहे.

संबंधित बातम्या – 

आरएसएसच्या नेत्याने मोडली शबरीमाला मंदिराची परंपरा

शबरीमाला : तृप्ती देसाई ‘गनिमी काव्या’ने घुसणार मंदिरात

शबरीमाला मंदिरात विशेष पूजा; महिला पत्रकारांना मज्जाव

शबरीमाला मंदिर महिला प्रवेश; ४५० गुन्हे तर २०६१ जणांना अटक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -