घरमनोरंजनसनी लिओनीचं 'Lovely Accident' गाणं व्हायरल

सनी लिओनीचं ‘Lovely Accident’ गाणं व्हायरल

Subscribe

सनी लिओनीच्या  'Lovely Accident' या गाण्याला युट्यूबवर आतापर्यंत २५ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. 

बॉलीवूडची प्रसिद्ध अदाकारा सनी लिओनीने नेहमीच तिच्या मादक अदांनी प्रेक्षकांना घायाळ केलं आहे. नुकतंच सनीचं ‘Lovely Accident’ हे नवीन गाणं व्हायरल झालं असून, सध्या हे गाणं इंटरनेट सेन्सेशन बनलं आहे. सनी लिओनीच्या आयटम नंबर्सना प्रेक्षकांनी नेहमीच भरभरुन पसंती दिली आहे. सनीच्या ‘बेबी डॉल’, ‘लैला ओ लैला’ आणि ‘डर्टी गर्ल’ या गाण्यांना लोकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून धरले. त्यापाठोपाठ आता सनीचं हे नवं गाणं तिच्या चाहत्यांना घायाळ करत आहेत. ‘Lovely Accident’ या गाण्यात सनी लिओनीचा जलवा पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. या गाण्यात सनी लिओनी सोबत अभिनेता आणि कॉमेडियन कृष्णा अभिषेकही ठुमके लगावताना दिसत आहे. सनीचं हे तडकतं फडकतं गाणं तपोश आणि हरजोत कौर यांनी गायलं असून, श्लोक लाल यांनी गाण्याचं लिखाण केलं आहे. युट्यूबवर ‘Lovely Accident’ हे गाणं रिलीज झाल्यानंतर काही वेळातच त्याला २५ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

Zee Music Company या म्युझिक कंपनीद्वारे हे गाणं युट्यूबवर अपलोड करण्यात आलं आहे. पॉर्न चित्रपटांमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री सनी लिओनी नेहेमीच आपल्या बिनधास्त भूमिकांमुळे चर्चेत असते. सनीने आजवर अनेक हिंदी चित्रपटांमधून प्रेक्षकांना घायळ केलं आहे. पॉर्न इंडस्ट्रीमधून आल्यामुळे सनी लिओनीवर अनेकदा टीका करण्यात आली आहे. सनीच्या चित्रपटांनाही विविध स्तरांतून विरोध करण्यात आला आहे. मात्र, सनीने आपल्या चाहत्यांचं मनोरंजन करण्यात आजवर कोणतीच कसर सोडलेली नाही. त्यामुळे आज जगभरात सनीचे लाखो-करोडो चाहते आहेत, जे तिच्यावर भरभरुन प्रेम करतात.

- Advertisement -

सनी लिओनी साऊथ इंडस्ट्रीमध्ये?

सनी लिओनी ‘वीरमादेवी’ या साऊथच्या चित्रपटामध्ये वीरमादेवीची मुख्य भूमिका साकारणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होती. वीरमादेवी चित्रपटाच्या निमित्ताने सनी दाक्षिणात्य सिनेसृष्टीत प्रवेश करणार असल्यामुळे तिचे चाहते अधिक उत्सुक होते. मात्र, सनी साकारणार असलेल्या वीरमादेवीच्या भूमिकेला काही कन्नड समूहांनी विरोध केला आणि पुढे या चित्रपटाची चर्चा हवेतच विरली. वीरमादेवी हे कर्नाटकातील एक ऐतिहासिक व्यक्तिमत्व आहे. या व्यक्तीमत्वासोबत कर्नाटकातील संस्कृती आणि शौर्याचा इतिहास जोडला गेला आहे. त्यामुळे चित्रपचटांमध्ये आक्षेपार्ह भूमिका साकारणाऱ्या सनी लिओनीने या चित्रपटात मुख्य भूमिका साकारु नये, अशी मागणी काही समूहांनी केली होती. त्यामुळे सनीचं साऊथ इंडस्ट्रीमध्ये पदार्पण होणार की नाही? यावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -