घरदेश-विदेशशबरीमाला मंदिरात ४ तृतीयपंथीयांनी केली पूजा

शबरीमाला मंदिरात ४ तृतीयपंथीयांनी केली पूजा

Subscribe

पोलीस सुरक्षेत पंबावरुन तृतीयपंथी सकाळी ८ वाजता मंदिराच्या दिशेने निघाल्या. सकाळी ९.४५ वाजता ते मंदिरात पोहचून त्यांनी पुजा केली. यावेळी त्यांना मंदिर प्रशासन तसंच कोणत्याही संघटनेने विरोध केला नाही.

केरळमधील प्रसिध्द शबरीमाला मंदिरामध्ये चार तृतीयपंथीयांनी मंगळवारी दर्शन घेतले. या तृतीयपंथीयांना रविवारी मंदिरात जाण्याची परवानगी देण्यात आली नव्हती. मात्र सोमवारी परवानगी मिळाल्यानंतर मंगळवारी सकाळी त्यांनी मंदिरात येऊन दर्शन घेतले. सकाळी एरुमेली पोहचल्यानंतर एर्नाकुलमच्या चार तृतीयपंथी भक्तांनी साडी नेसली आणि पोलीस सुरक्षेत पंबावरुन सकाळी ८ वाजता मंदिराच्या दिशेने निघाल्या. सकाळी ९.४५ वाजता ते मंदिरात पोहचून त्यांनी पुजा केली. यावेळी त्यांना मंदिर प्रशासन तसंच कोणत्याही संघटनेने विरोध केला नाही.

साडी नेसून केला मंदिरात प्रवेश

रविवारी या ४ तृतीयपंथींना पोलिसांनी मंदिरात प्रवेश यासाठी नाकारला होता कारण त्यांनी साडी नेसून दर्शन करणार असल्याचे सांगितले होते. यासंदर्भात त्यांनी कोट्टायम पोलीस अधिक्षकांकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर सोमवारी केरळच्या हाय कोर्टाद्वारे नियुक्त केलेल्या पोलीस महानिर्देशक ए. हेमचंद्रन यांच्याशी संपर्क केला. त्यानंतर त्यामधील एका तृतीयपंथीयाने मीडियाला आम्हाला मंदिरात प्रवेश मिळाली असल्याची परवानगी दिली. तृतीयपंथीयांना याआधी देखील मंदिरामध्ये जाण्याची परवानगी देण्यात आली होती आणि या समूहाच्या लोकांनी या मंदिरात पुजा देखील केली होती.

- Advertisement -

१० ते ५० वयोगटातील महिलांना प्रवेश नाहीच

चारही तृतीयपंथीयांनी साडी नेसून मंदिरात प्रवेश करुन अयप्पाचे दर्शन घेतले. या सर्वांना पंबा येथून मंदिराच्या पायऱ्या चढण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस तैनात करण्यात आले होते. सकाळी ९.४५ वाजता या चार जणांनी मंदिरात प्रवेश करुन अयप्पाचे दर्शन घेतले. याआधी शबरीमाला मंदिर आणि मंदिराच्या आसपासच्या परिसर विरोधाचे स्थान बनले आहे. शबरीमाला मंदिरात १० ते ५० वयोगटातील महिलांना मंदिर प्रवेशाला विरोधत करत आंदोलन करण्यात आले होते. दरम्यान सुप्रीम कोर्टाने काही महिन्यापूर्वी शबरीमाला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश देण्याचे आदेश दिले होते. तरी देखील मंदिरात महिलांना प्रवेश दिला जात नाही.

- Advertisement -

हेही वाचा – 

शबरीमाला मंदिर प्रवेशापासून २ महिलांना रोखलं

शबरीमाला मंदिर परिसराला युध्दभूमी केले – के जे अल्फॉन्स

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -